इजिप्तच्या लाल समुद्रात मोठी दुर्घटना, 44 पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या पाणबुडीला जलसमाधी!

इजिप्तच्या लाल समुद्रात मोठी दुर्घटना, 44 पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या पाणबुडीला जलसमाधी!

इजिप्तच्या लाल समुद्रात पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेच सहाहून अधिक जणांचा मृत्यू  आणि 9 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाल्याची शक्यता आहे. पाणबुडीत एकून 44 प्रवासी प्रवास करत होते.

सदर घटना गुरुवारी (27 मार्च 2025) सकाळच्या सुमारास घडल्याचे वृत्त आहे. सिंदबाद नावाची पर्यटन पाणबुडी गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांना पाण्याखालील जग दाखवण्याचे काम करत आहे. अशाच 44 पर्यटकांना घेऊन इजिप्तच्या लाल समुद्रात प्रवाळ खडक आणि उष्णकटिबंधीय माशांच जग पाहण्यासाठी ही पाणबुडी 72 फूट खोल गेली होती. याच दरम्यान पाणबुडी बुडाल्याची घटना घडली, पाणबुडी बुडण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या दुर्घटनेत सहाहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 29 जणांना वाचवण्यात यश आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. BBC ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हार्दिक पंड्यायला पुन्हा दंड हार्दिक पंड्यायला पुन्हा दंड
बंदीच्या शिक्षेमुळे पहिल्या सामन्यास मुकलेल्या हार्दिक पंड्याने यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत शनिवारी पाऊल ठेवले अन् पहिल्याच सामन्यात त्याला कारवाईला...
जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यातील कामगार संघटना आक्रमक, 20 मे रोजी महाराष्ट्र बंदचा इशारा
ज्ञानसाधक वामनरावांच्या स्मृतींना उजाळा, जन्मशताब्दीनिमित्त जन्मगावी कुटुंबीयांनी जागवल्या आठवणी
ताडदेवकरांनी अनुभवला स्वागत यात्रेचा जल्लोष
IPL Points Table – सारेकाही निसटून चाललेय…
हरियाणाचे दुहेरी जेतेपद हुकले, किशोर गटात जिंकले, पण किशोरींच्या गटात उपविजेते
शिवमुद्रा, अष्टविनायक विजेते