हिंदुंना दंगलीसाठी वापरणार आणि हे मात्र सत्तेसाठी गळाभेटी घेत फिरणार! ‘सौगात-ए-सत्ता’ म्हणत उद्धव ठाकरेंची भाजपला सणसणीत चपराक

हिंदुंना दंगलीसाठी वापरणार आणि हे मात्र सत्तेसाठी गळाभेटी घेत फिरणार! ‘सौगात-ए-सत्ता’ म्हणत उद्धव ठाकरेंची भाजपला सणसणीत चपराक

ईदच्या निमित्तानं भाजपकडून ‘सौगात-ए-मोदी’चा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या ‘सौगात-ए-मोदी’ कार्यक्रमावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा ठाकरे शैलीत समाचार घेतला आहे. ‘हिंदुंना दंगलीसाठी वापरणार आणि हे मात्र सत्तेसाठी गळाभेटी घेत फिरणार. ही तर ‘सौगात-ए-सत्ता’ म्हणत ‘सौगात-ए-मोदी’वरून उद्धव ठाकरेंनी भाजपला सणसणीत चपराक लगावली. आमच्यावर हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप करणारे त्यांच्या पक्षाच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढणार का? भाजपने हिंदुत्त्व सोडलं का? असे एकापाठोपाठ एक सवाल करत त्यांनी भाजपचं ढोंग उघडं पाडलं आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ‘शिवसेनेला ज्यावेळी मुस्लिम समाजाने मोठ्याप्रमाणावर मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्यासोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते. त्यांनी लगेच आवई उठवली होती की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्व सोडलं. मुस्लिम लोकांनी शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना मत दिलं तर हा ‘सत्ता जिहाद’ आहे असं बोललं गेलं. आता मला एका गोष्टींचं समाधान आहे की इथे जे बुरसटलेले हिंदुत्त्ववादी आहेत, ज्यांना मी बोगस हिंदुत्त्ववादी आहेत त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे. कारण ‘ईद’ च्या निमित्ताने सौगात-ए-मोदी हा कार्यक्रम भाजपने हाती घेतलेला आहे. 32 लाख – 35 लाख मुस्लिम कुटुंबीयांच्या घरी 32 – 35 हजार भाजप कार्यक्रर्ते मुस्लिमांना सौगात-ए-मोदी देणार आहे. हे सौगात ए मोदी नसून सौगात ए सत्ता आहे. सत्तेसाठी हे कुटल्याही थराला जाऊ शकतात. त्याचं निर्लज्ज उदाहरण आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांवेळी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा घोषणा देणारे आता ‘सौगात’ म्हणजे भेट द्यायला चालले आहेत. वर्षभर मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आमच्याकडचे ‘उडाणटप्पू’ज्यांचा उल्लेख अनिल परब यांनी विधानसभेत केला ते आता टोप्या घालून कसे सौगात घेऊन जात आहेत ते मला बघायचं आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

आमच्यावर हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी आधी त्यांच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढावा. आता त्यांचं ढोंग उघडं पडलेलं आहे, असंही ते म्हणाले.

मला एक चिंता आहे की निवडणुकांच्यावेळी मोदी म्हणाले होते की मंगळसूत्र चोरीला जाणार, यांना देणार त्यांना देणार. मग आता हिंदुंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? हिंदूचा पक्ष आता राहिला आहे का? हिंदुंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार? हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे की निवडणुकीपुरती राहणार? असे खरमरित सवाल त्यांनी केले. जसं निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला लाडकी बहीण, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अशा थापा मारल्या आणि निवडणुका जिंकल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही असं दाखवत आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

आता हनुमान जयंती येते मग रामनवमी येईल मग त्यावेळेला भाजपचा बहुसंख्यांक सेल असा काही आहे? का जसा अल्पसंख्याक सेल आहे तसा बहुसंख्यांक सेल जर असेल तर त्या सेल मध्ये म्हणजे बॅटरी मध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का? कारण ही भाजपाकडन भेट जाते भाजपाकडे जो पैसा आहे त्या पैशात भेट जाते आहे. तसं त्यांनी सांगितल की बैसाखीला हे वाटणार आहे. चांगली गोष्ट आहे इस्टरला वाटणार खूप चांगली गोष्ट आहे. ही सौगात मोदी ईदच्या निमित्ताने भेट देतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची त्यांना दंगलीसाठी वापरायचं आणि मग ज्यांना दंगली करायला लावायची त्यांचे जीव जातात, घरं जाळली जातात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते. त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि मग हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाभेटी घेत फिरणार. मी असं ऐकलंय की आता नुकतंच दिल्लीची निवडणूक झाली. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजपची सत्ता आली. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इफ्तार पार्टी केली असं मी ऐकलं. खरं कुठतरी मी काही बघितलं नाही.

सौगात-ए-सत्ता या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे का. आणि ते जे काही करतायत हा सुद्धा मग सत्ता जिहाद आम्ही मानायचा का? याच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे. तसं जर ते म्हणणार नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा आरोप करताय? आम्ही तर आमच्या कामाने आणि आमच्या कर्तुत्वाने समाजाची मत मुस्लिम समाजाची आणि इतर समाजाची मत आम्ही मिळवत असू असू तर तुमच्या पोटात दुखायच कारण काय? आजपर्यंत तुम्ही धार्मिक विष पेरत आलात. ज्या धर्मामध्ये तुम्ही विष पेरलंत त्या धर्मामध्ये तुम्ही घरोघरी जाऊन अन्नपदार्थ देताय. तुम्हाला त्यांना विष द्यायच की अन्न द्यायचं हे तर इथे सांगा असे उद्धव ठाकरे म्हणाले

सुप्रीम कोर्टाला माझी विनंती आहे की, आता लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे. जो काही निर्णय असेल तो असेल. सत्याला स्मरून सत्यमेव जयते आहे त्यानुसार निकाल लागलाच पाहिजे. सुप्रीम कोर्टाने आयाराम गयारामची दखल घेतली असेल तर त्या आता आयाराम गयारामची मंदिर बांधली जाते सत्ता पद देऊन ती मंदिर तोडली पाहिजे असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले? ‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले?
आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला, या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे  यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएमपासून ते मराठी...
बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात… संतोष देशमुख प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात
मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? राज ठाकरे यांचा थेट सवाल
औरंगजेबाची कबर उखडून टाकावी का? राज ठाकरे यांची पहिलीच प्रतिक्रिया काय? काय केली सूचना?
शिवाजी महाराजांसमोरच संभाजी महाराजांनी औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारली होती, राज ठाकरे यांचं मोठं विधान, शिवकालीन परिस्थिवर केलं भाष्य
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत… राज ठाकरे यांचा छावा चित्रपटानंतर झालेल्या वादावरुन जोरदार हल्लाबोल
औरंगजेबावरुन राज ठाकरे यांचे राजकारण्यांना फटकारे, काय म्हणाले पाहा ?