पार्टी असो किंवा मीटिंग काळ्या रंगाच्या कुर्तीने खुलून येईल तुमचे सौंदर्य! वाचा सविस्तर
काळा रंग आणि फॅशन याचं नातं एकदम जवळचं आहे. फॅशनच्या जगतामध्ये काळ्या रंगाचं महत्त्व हे खूपच अबाधित आहे. म्हणूनच काळ्या रंगाला कायमच मागणी राहिलेली आहे. काळ्या रंगाच्या साड्या, ड्रेसेस, फ्राॅक्स हे कायमच इन फॅशन असतात. काळा रंग हा आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो.
काळा पारंपारिक पोशाख नेहमीच फॅशन आणि ट्रेंडमध्ये असतो. काळा रंग हा कायमच इन फॅशन असतो. म्हणूनच अनेकदा सेलिब्रिटी सुद्धा हा ट्रेंड फाॅलो करताना आपल्याला दिसतात. काळा रंग कोणत्याही प्रसंगासाठी योग्य आहे. काळा कुर्ता सेट महिलांना एक सुंदर आणि स्मार्ट लूक देतो. स्टायलिश आणि ट्रेंडी लूक मिळवण्यासाठी तुम्ही काळ्या रंगाचा कुर्ता सेट कॅरी करू शकता.
कोणताही कार्यक्रम असो किंवा लग्न समारंभ, काळ्या रंगाचे कपडे तुमचा लूक सर्वत्र आकर्षक बनवण्याचे काम करतात. ब्लॅक कुर्तावरील इंडोवेस्टर्न लूक देखील तितकाच आकर्षक करतो. जिन्सवर तसेच लॉंग स्कर्ट वर देखील ब्लॅक लूक करता येतो. नव्या ट्रेंडिंग मध्ये असलेल्या ब्लॅक चिकनकारी कुर्ती मध्ये आपण इंडियन आणि वेस्टर्न हे दोन्हि लूक देऊ शकतो. यामध्ये देखील ब्लॅक लूक खुलून दिसतो.
काळ्या कुर्त्यांमध्ये एंब्रायडरी कुर्ता सेट, जरी वर्क कुर्ता सेट, प्लेन ब्लॅक कुर्ता सेट , अनारकली , अशा विविध प्रकारांच्या काळ्या रंगाच्या कुर्ती आपले सैंदर्य खुलवतात. साधी ब्लॅक कुर्ती घालून आपण त्यावर जीन्स घातल्यावरही एक मस्त लूक आपल्याला मिळतो. काळा कुर्ता आणि स्कर्ट हे काॅम्बिनेशन तर एकदमच भन्नाट आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List