चढ-उतारानंतर शेअर बाजार सावरला
आठवडय़ाच्या चौथ्या दिवशी शेअर बाजार सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 317 अंकांनी वधारून 77,606 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 105 अंकांनी मजबूत होऊन 23,591 अंकांवर स्थिरावला. ऑटो आणि फार्मा सेक्टर वगळता सर्व सेक्टरमधील शेअर्स वधारले. बीएसईचा मिडपॅप इंडेक्स 0.5 टक्के आणि स्मॉलपॅप इंडेक्स 1 टक्का वाढून बंद झाला. एलअँडटी, एचडीएफसी बँक, इन्पहसिस, पॉवर ग्रीड, टायटन, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, ऑक्सिस बँक, मारुती, टेक, महिंद्रा, झोमॅटो, आयटीसीच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर टाटा मोटर्स, सन फार्मा, एशियन पेंट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, टाटा स्टिलचे शेअर्स घसरले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List