Aamir Khan- आमिर खानने वयाच्या 60 व्या वर्षी युट्यूब चॅनल का सुरु केले?

Aamir Khan- आमिर खानने वयाच्या 60 व्या वर्षी युट्यूब चॅनल का सुरु केले?

बॉलिवूडमध्ये आमिर खानची ओळख ही मिस्टर परफेक्शनिस्ट अशी आहे. आमिर खानचे स्वतःचे असे नियम असल्यामुळे, आमिर खान हा कायम चर्चेत असतो. आता आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. खरंतर आमिर खानचे स्वतःचे वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंट नाही. पण आमिर खान प्रॉडक्शनचे स्वतःचे सोशल मीडिया हँडल आहे. इथेच आमिर त्याच्या चित्रपटांशी संबंधित अपडेट्स त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करतो. आता अभिनेत्याने एक नवीन पाऊल उचलले आहे. आमिरने त्याचे यूट्यूब चॅनल लाँच केले आहे आणि त्यामागे एक खास उद्देश आहे. आमिरच्या या यू ट्यूब चॅनलचे नाव ‘आमिर खान टाॅकिज’ असे ठेवण्यात आलेले आहे.

आमिर खान प्रॉडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया हँडलने शेअर केली आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे – सिनेमा, कथा आणि अनफिल्टर केलेले क्षण. आमिर खानच्या यू ट्यूब चॅनलची घोषणा होताच आमिरच्या चाहत्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला सुरुवात केलेली आहे. अवघ्या काही तासांमध्येच हजारोंच्यावर चॅनल सबस्क्राइब केलेले आहे.

बाॅलिवूडमधील बहुसंख्य स्टार सोशल मीडियावर सक्रिय असतात. शाहरुख खानपासून ते सलमानपर्यंत सर्वांचेच चाहते खूप मोठे आहेत. याशिवाय अमिताभ बच्चनपासून ते धर्मेंद्रपर्यंत सर्वजण सोशल मीडियावर सक्रिय राहतात. पण आमिर खान कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही. ते फक्त त्याचं प्रोडक्शन हाऊस आहे. या माध्यमातून तो फॅन्ससोबत संवाद साधतो आणि चित्रपटा संदर्भात सर्व अपडेट्स देतो. पण आता आमिर खान युट्यूबवर आला आहे. या यू ट्यूब चॅनेलद्वारे शूटिंगमधील मनोरंजक कथा आणि किस्से आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले? ‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले?
आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला, या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे  यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएमपासून ते मराठी...
बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात… संतोष देशमुख प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात
मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? राज ठाकरे यांचा थेट सवाल
औरंगजेबाची कबर उखडून टाकावी का? राज ठाकरे यांची पहिलीच प्रतिक्रिया काय? काय केली सूचना?
शिवाजी महाराजांसमोरच संभाजी महाराजांनी औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारली होती, राज ठाकरे यांचं मोठं विधान, शिवकालीन परिस्थिवर केलं भाष्य
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत… राज ठाकरे यांचा छावा चित्रपटानंतर झालेल्या वादावरुन जोरदार हल्लाबोल
औरंगजेबावरुन राज ठाकरे यांचे राजकारण्यांना फटकारे, काय म्हणाले पाहा ?