समुद्री चाच्यांनी बंधक बनवलेल्या खलाशांमध्ये रत्नागिरीतील दोघे, सुटकेसाठी कुटुंबीयांची सरकारकडे याचना
एमवी बीटू रिव्हर या जहाजावर 17 मार्च 2025 रोजी रात्री 7:45 वाजता मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यावरील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटाजवळ, सँटो अँटोनियो दो प्रिन्सिपेपासून 40 नॉटिकल मैल आग्नेय दिशेला चाच्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 10 खलाशांना बंधक करण्यात आले होते. या खलाशांमध्ये 7 हिंदुस्थानी आणि 3 रोमानियन खलाशांचा समावेश आहे. बंधक करण्यात आलेल्या या खलाशांमध्ये रत्नागिरीतील दोन तरुणांचा समावेश आहे.
मिरकर समीन जावेद आणि सोलकर रिहान शब्बीर हे दोघेही रत्नागिरीचे रहिवासी असून, त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. याशिवाय, तमिळनाडू, बिहार, लक्षद्वीप आणि केरळ येथील खलाशांचाही या बंधकांमध्ये समावेश आहे. समुद्री चाच्यांनी बंधक बनवलेल्या 10 खलाशांना सोडवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी रत्नागिरीतील कुटुंबांनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे केली आहे.
जावेद हसनमिया मिरकर आणि शब्बीर अ. लतीफ सोलकर यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या रत्नागिरी बंदर कार्यालयाला पत्र लिहून तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “गेल्या दहा दिवसांपासून आम्हाला आमच्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. शिपिंग महासंचालनालयाकडून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून अद्याप कोणतेही अपडेट्स मिळालेले नाहीत. यामुळे आम्ही प्रचंड तणावात आहोत. त्यांनी पुढे नमूद केले की, मर्चंट शिपिंग कायदा 1957 च्या नियम 4 अंतर्गत डीजी शिपिंगची जबाबदारी येते आणि या प्रकरणात महाराष्ट्र सागरी मंडळ ही सक्षम प्राधिकरण आहे.
एमव्ही बिटू रिव्हर आय एम ओ क्रमांक: 9918133 हे जहाज भारतातील मॅरिटेक टँकर मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे संचालित आहे. या कंपनीचा परवाना क्रमांक आरपीएसएल -एमयूएम-162033 असून, ती मुंबईतील गोरेगाव येथील लोटस कॉर्पोरेट पार्कमध्ये कार्यरत आहे. कंपनीचा संपर्क क्रमांक नरेश कंवर (9136443961) आणि देवेंद्र पवार (9136443972)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List