IPL 2025 – ते तुझं काम होतं! ‘मुलतानचा सुलतान’ वीरेंद्र सेहवागची LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बोचरी टीका

IPL 2025 – ते तुझं काम होतं! ‘मुलतानचा सुलतान’ वीरेंद्र सेहवागची LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बोचरी टीका

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. या लढतीत ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. लखनऊने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ दिल्लीची अवस्था 5 बाद 65 अशी होती. मात्र आशुतोष शर्मा आणि विपराज निगम यांनी विस्फोटक खेळी करत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. यानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू, ‘मुलतानचा सुलतान’ वीरेंद्र सेहवाग याने पंतवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली.

शेवटच्या षटकामध्ये दिल्लीला विजयासाठी 6 धावांची गरज होती. यावेळी स्ट्राईकवर मोहित शर्मा होता. पंतने चेंडू डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज अहमदकडे सोपवला. त्याने चांगला चेंडू टाकला आणि मोहित शर्माला चकवले. यावेळी पंतकडे मोहितला यष्टीचित करण्याची चांगली संधी होती. मात्र त्याने ती गमावली. त्यानंतर पुढच्या चेंडूवर मोहितने एक धाव घेत स्ट्राईक आशुतोषला दिली आणि त्याने षटकार खेचत स्टाईलमध्ये संघाला विजय मिळवून दिला. लखनऊच्या पराभववर माजी खेळाडू अमित मिश्रा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी परस्परविरोधी विधाने केली आहेत.

लखनऊच्या पराभवामध्ये दुखापग्रस्त गोलंदाजांचा वाटा असल्याचे मिश्रा म्हणाला. आवेश खान, मयंक यादव, मोहसीन खान आणि आकाश दीप हे चार वेगवान गोलंदाज जायबंदी असल्याने लखनऊच्या गोलंदाजीची धार बोथट झाली. या गोलंदाजांची कमतरता लखनऊला नक्कीच भासली. हे गोलंदाज असले तर लखनऊला हा सामना जिंकता आला असता. दबावाच्या स्थितीत कशी कामगिरी करावी यासाठी अनुभव महत्त्वाचा असतो, असे मिश्रा म्हणाला.

माझे शतक विसर, मोठे फटके मार, श्रेयसने प्रोत्साहन दिल्याचे शशांकचा खुलासा

तर दुसरीकडे सेहवागने पंतच्या धोरणांमुळे खेळ लखनऊच्या हातातून निसटला असे म्हटले आहे. आवेश खान असता तर लखनऊने पहिल्या षटकातच दोन विकेट घेतल्या नसत्या. कारण तो असता तर पहिले षटक शार्दुलने टाकले नसते. त्यामुळे आपण असेही म्हणू शकतो की दिल्लीने कदाचित एक किंवा दोन षटक बाकी असतानाच सामना जिंकला असता. पण जे खेळाडू मैदानात नव्हते त्यांचा विचार करण्याऐवजी जे खेळत होते त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे होते. खेळावर नियंत्रण कसे ठेवायचे, खळ कसा मंदावायचा आणि योग्य वेळी, योग्य गोलंदाज कसा आणायचा हे काम ऋषभ पंतचे होते. यात त्याची चूक झाली, असे सेहवाग म्हणाला.

IPL 2025 – धावांचे तूफान धडकणार, हैदराबाद-लखनौ लढतीत आज फटकेबाजी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले? ‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले?
आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला, या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे  यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएमपासून ते मराठी...
बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात… संतोष देशमुख प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात
मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? राज ठाकरे यांचा थेट सवाल
औरंगजेबाची कबर उखडून टाकावी का? राज ठाकरे यांची पहिलीच प्रतिक्रिया काय? काय केली सूचना?
शिवाजी महाराजांसमोरच संभाजी महाराजांनी औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारली होती, राज ठाकरे यांचं मोठं विधान, शिवकालीन परिस्थिवर केलं भाष्य
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत… राज ठाकरे यांचा छावा चित्रपटानंतर झालेल्या वादावरुन जोरदार हल्लाबोल
औरंगजेबावरुन राज ठाकरे यांचे राजकारण्यांना फटकारे, काय म्हणाले पाहा ?