दुपारच्या जेवणानंतर लगेच झोप येते का? झोप टाळण्यासाठी या घरगुती टिप्स फॉलो करा

दुपारच्या जेवणानंतर लगेच झोप येते का? झोप टाळण्यासाठी या घरगुती टिप्स फॉलो करा

दुपारी जेवल्यानंतर लोकांना अनेकदा झोप येते. जेवल्यानंतर झोपावेसे वाटते. पण ऑफिसमध्ये जेवणानंतर झोपणे तुमच्यासाठी देखील समस्या निर्माण करू शकतात. काही लोकांचा एक निश्चित दिनक्रम असतो की त्यांना जेवणानंतर झोपावे लागते. या सवयीला फूड कोमा असेही म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का, जेवल्यानंतर लगेच झोप का येते? दुपारी जेवणानंतर आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि मेलाटोनिन नावाचे हार्मोन्स बाहेर पडू लागतात, ज्यामुळे आपल्याला झोप येते. पण हे टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करु शकतात.

एप्पल साइडर व्हिनेगर 

तुम्ही दुपारचे जेवण कराल तेव्हा त्यापूर्वी एप्पल साइडर व्हिनेगर प्या. हे व्हिनेगर प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे इन्सुलिनची पातळीही वाढत नाही. तुम्ही एका ग्लास पाण्यात एक चमचा व्हिनेगर मिसळून जेवणाच्या २० मिनिटे आधी ते पिऊ शकता.

जेवणानंतर चालणे आवश्यक आहे.

दुपारच्या जेवणानंतर थोडे फिरणे देखील फायदेशीर आहे. किमान 10-15 मिनिटे चालणे यासारख्या हलक्या व्यायामामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारते आणि त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने देखील वाटेल.

देशी तूपाचा आहारात समावेश करा

तुम्ही तुमच्या जेवणात देशी तूप नक्कीच समाविष्ट करावे. त्यात निरोगी चरबी आढळतात. देशी तूप इन्सुलिन वाढण्यापासून देखील रोखते. यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. तुम्ही रोटी किंवा डाळ यात तूप मिसळून खाऊ शकता.

जेवणाबरोबर सॅलड खा

तुमच्या जेवणासोबत सॅलड नक्की खा. त्यामध्ये असलेले फायबरमुळे शरीराची पचन प्रक्रिया मंदावते. सॅलड खाल्ल्याने इन्सुलिनच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. हिरव्या पालेभाज्या आणि कच्च्या भाज्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. जास्त फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने निद्रानाश होणार नाही.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ऐश्वर्या राय बच्चनचे बॉडीगार्ड आहेत मराठमोळे? महिन्याचा पगार ऐकून व्हाल चकीत ऐश्वर्या राय बच्चनचे बॉडीगार्ड आहेत मराठमोळे? महिन्याचा पगार ऐकून व्हाल चकीत
विश्वसुंदरी म्हणून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ओळखली जाते. तिचे सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ऐश्वर्याचे जगभरात लाखो...
Video: हजारोंचे एअरपॉड्स फेकले तर कोणी पुरस्कार, दारुच्या बाटल्या; सेलिब्रिटींच्या घराच्या कचऱ्यात काय असतं?
फिट राहण्यासाठी मोड आलेले कडधान्य खाताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल नुकसान
मखान्यापासून 10 मिनिटांत बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, आरोग्यासाठी फायदेशीर
‘या’ भाज्यांच्या सेवनाने उन्हाळ्यात यूरिक ॲसिड होईल कमी? जाणून घ्या
Tonga Islands Earthquake – म्यानमारनंतर टोंगा बेटांवर भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा
Himachal News – हिमाचल प्रदेशात मणिकर्णमध्ये भूस्खलन, 6 जणांचा मृत्यू; 5 जखमी