Salman Khan- जेवढं आयुष्य आहे तेवढं जगायचं… लाॅरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल सलमानने सोडलं मौन

Salman Khan- जेवढं आयुष्य आहे तेवढं जगायचं… लाॅरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल सलमानने सोडलं मौन

सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यात 1998 पासून वाद सुरू आहे. लॉरेन्स बिश्नोईने सलमानला अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर अभिनेत्याची सुरक्षा लगेच वाढवण्यात आली. परंतु ऑक्टोबर 2024 मध्ये बिश्नोईने सलमानचा जवळचा मित्र बाबा सिद्दीकीची सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालून हत्या केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. यानंतर सलमानची सुरक्षा अधिक वाढवण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव ‘सिकंदर’ चा भव्य ट्रेलर लाँच इव्हेंट म्हणूनच रद्द करण्यात आला होता. नुकताच चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान, सलमानने लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या धमक्यांबाबत मौन सोडले.

 

कार्यक्रमादरम्यान सलमानला विचारण्यात आले की, त्याला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांना तो घाबरत नाही का? यावर तो म्हणाला, ‘जेवढं आयुष्य आहे तेवढं ते जगायचं बाकी सर्व देव, अल्लाह यांच्या हातात आहे.’

सलमान लॉरेन्स बिश्नोई  वाद नेमका काय आहे?
1998 मध्ये ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानने एका काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. तथापि, सलमानने आणि त्याचे वडील सलीम खान यांनी हे सर्व आरोप नाकारले आहेत. या प्रकरणात, 2006 मध्ये  कोर्टाने सलमानला 1 वर्षाची शिक्षा सुनावली होती, तर जोधपूर कोर्टाने त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. तथापि, 7 एप्रिल 2018 मध्ये सलमानला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जामीन मंजूर करण्यात आला. तर, राजस्थान उच्च न्यायालयाने 2016 मध्येच सलमानला काळवीट शिकार प्रकरणातून निर्दोष मुक्त केले होते.

 

लॉरेन्स बिश्नोईने सलमानबाबत काय म्हटले होते?
बिश्नोई समाज प्राण्यांचे, विशेषतः काळवीटांचे रक्षण करण्यासाठी ओळखला जातो. ते काळे हरण हे त्यांचे गुरु जंबेश्वर यांचे अवतार मानतात. सलमानमुळे संपूर्ण बिश्नोई समुदाय दुखावला गेला होता. 2018 मध्ये जोधपूर न्यायालयात हजर असताना लॉरेन्स बिश्नोईने  सलमानला सर्वांसमक्ष मारण्याची धमकी दिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले? ‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले?
आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला, या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे  यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएमपासून ते मराठी...
बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात… संतोष देशमुख प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात
मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? राज ठाकरे यांचा थेट सवाल
औरंगजेबाची कबर उखडून टाकावी का? राज ठाकरे यांची पहिलीच प्रतिक्रिया काय? काय केली सूचना?
शिवाजी महाराजांसमोरच संभाजी महाराजांनी औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारली होती, राज ठाकरे यांचं मोठं विधान, शिवकालीन परिस्थिवर केलं भाष्य
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत… राज ठाकरे यांचा छावा चित्रपटानंतर झालेल्या वादावरुन जोरदार हल्लाबोल
औरंगजेबावरुन राज ठाकरे यांचे राजकारण्यांना फटकारे, काय म्हणाले पाहा ?