न्यायमूर्ती वर्मा यांच्या बदलीचा सर्वोच्च न्यायालय करणार पुनर्विचार, अद्याप FIR का नोंदवला गेला नाही? बार असोसिएशनचा सवाल

न्यायमूर्ती वर्मा यांच्या बदलीचा सर्वोच्च न्यायालय करणार पुनर्विचार, अद्याप FIR का नोंदवला गेला नाही? बार असोसिएशनचा सवाल

वादग्रस्त न्यायमूर्ती वर्मा यशवंत यांच्या बदली प्रकरणी आज 6 बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी देशाचे मुख्य न्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची भेट घेतली. या भेटीनंतर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची बदली मागे घेण्याची मागणी विचारात घेतली जाईल, असे आश्वासन न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी बार असोसिएशनच्या अध्यक्षांना दिले, असं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. 14 मार्च रोजी झालेल्या आगीच्या घटनेत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा सापडल्या होत्या. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घेतला होता. यालाच अलाहाबादसह 6 बार असोसिएशनने विरोध केला आहे.

अलाहाबाद बार असोसिएशनचे प्रमुख अनिल तिवारी म्हणाले की, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बदलीच्या आमच्या मागणीवर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, अलाहाबाद बार असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या निर्णयाचा निषेध केला आणि अनिश्चित काळासाठी संप सुरू केला.

असोसिएशनने म्हटले आहे की, ते न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप सहन करणार नाही. गुरुवारी सरन्यायाधीशांच्या आश्वासनानंतर, बार संघटनेने संप सुरू ठेवण्याबाबत पुनर्विचार करणार असल्याचं सांगितलं आहे. सरन्यायाधीशांना दिलेल्या निवेदनात, बार संघटनांनी म्हटले आहे की, न्यायव्यवस्थेतून भ्रष्टाचार संपवायला पाहिजे. तसेच 14 मार्चची घटना घडूनही अद्याप एफआयआर का नोंदवला गेला नाही, असा प्रश्नही बार असोसिएशनने उपस्थित केला. जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर देशभरातील उच्च न्यायालयांच्या बार असोसिएशन निदर्शने करतील, असे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्यापासून कामाला लागा, महाराष्ट्रातील प्रत्येक… राज ठाकरे यांनी दिला मराठीचा नारा उद्यापासून कामाला लागा, महाराष्ट्रातील प्रत्येक… राज ठाकरे यांनी दिला मराठीचा नारा
Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025: मनसे नेते राज ठाकरे यांनी रविवारी गुढी पाडवा मेळाव्यातून विविध विषयांवर हात घातला. यावेळी...
CSK vs RR – राजस्थान रॉयल्सने अटीतटीच्या लढतीत चेन्नईवर केली मात, सीएसकेचा सलग दुसऱ्यांदा पराभव
Maharashtra Kesari 2025 : सोलापूरचा वेताळ शेळके बनला महाराष्ट्र केसरी, किताबी लढतीत पृथ्वीराज पाटीलवर केली मात
अदानी हुशार निघाला, इकडे आपण अडाणी निघालो! राज ठाकरेंचा हल्लाबोल
‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले?
बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात… संतोष देशमुख प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात
मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? राज ठाकरे यांचा थेट सवाल