Hair Spa- हेअर स्पा करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचे केस निरोगी राहतील!
केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी हेअर स्पा ट्रीटमेंट केली जाते. कोरडे आणि खराब झालेले केस मऊ करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. हेअर स्पा करण्यासाठी प्रथम केस शॅम्पूने स्वच्छ केले जातात. नंतर केसांवर हेअर क्रीम लावले जाते. यानंतर, केसांवर हेअर मास्क लावला जातो आणि वाफ दिली जाते. नंतर केसांना कंडिशनर लावा आणि केस पुन्हा धुवा आणि कोरडे करा. असे मानले जाते की हेअर स्पा केल्याने केसांची वाढ जलद होते, केस मऊ होतात आणि कोंड्याची समस्या दूर होते. पण हेअर स्पा करताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे केले नाही तर तुमचा वेळ, पैसा आणि ऊर्जा वाया जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया की हेअर स्पा करण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
गरजेपेक्षा एखादी गोष्ट जास्त केली की, त्याचे फायद्यापेक्षा नुकसान अधिक प्रमाणात होते. वारंवार हेअर स्पा केला तर केस खराब होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. महिन्यातून किमान एकदा हेअर स्पा करणे पुरेसे आहे. महिला कोणत्याही खास कार्यक्रमाला जाण्यापूर्वी हेअर स्पा करून घेतात. पार्ट्या किंवा फंक्शन्समध्ये केसांना नवीन लूक देण्यासाठी केसांची स्टाईल केली जाते. हेअर स्पा नंतर ब्लोअर किंवा स्ट्रेटनर वापरणे टाळावे. यामुळे केसांना मिळणारे पोषण नष्ट होते.
हेअर स्पा करणार असाल तर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की हेअर स्पा केल्यानंतर तुम्ही तेल किंवा हेअर पॅक लावू नये. स्पा केल्यानंतर २ ते ३ दिवसांनी तुम्ही कंडिशनर आणि सीरम वापरू शकता. यामुळे केस ओलावा आणि चमकदार राहतील. स्पा केल्यानंतर काही दिवसांनी शाम्पू वापरता तेव्हा प्रथम तो पाण्यात पातळ करा. याचा अर्थ असा की केसांना थेट शाम्पू लावण्यापूर्वी ते थोडेसे पाण्यात मिसळा आणि नंतर ते केसांना लावावे.
स्पा केल्यानंतर केस मोकळे सोडू नका. हेअर स्पा केल्यानंतर, केसांना धूळ आणि घाणीपासून वाचवणे महत्वाचे आहे. बाहेर जाण्यापूर्वी तुमचे केस स्कार्फ किंवा टोपीने झाकून घ्या. केस जास्त घट्ट बांधणे चांगले नाही, म्हणून केस थोडे सैल बांधा.
हेअर स्पा केल्यानंतर २ ते ३ दिवस केस धुतले जात नाहीत. केसांवर कोणत्याही स्वरूपात पाणी वापरणे टाळा. कारण हेअर स्पा दरम्यान केसांचे डीप कंडिशनिंग केले जाते. केस धुतले तर त्यातील ओलावा निघून जाईल आणि केस कोरडे दिसतील.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List