पुणे महापालिकेचा डांबर खरेदीमध्ये घोटाळा, कंपनीकडून थेट खरेदी न केल्याने कोट्यवधी रुपयांचा चुराडा

पुणे महापालिकेचा डांबर खरेदीमध्ये घोटाळा, कंपनीकडून थेट खरेदी न केल्याने कोट्यवधी रुपयांचा चुराडा

पुणे महापालिकेत डांबर खरेदी घोटाळा झाला असून, महापालिकेला डांबरपुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) विक्री केल्याचा आरोप माजी नगरसेवक नीलेश निकम यांनी केला आहे. थेट कंपनीकडून डांबर खरेदी न करता ठेकेदाराकडून डांबर खरेदीमुळे पालिकेच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचेही निकम यांनी नमूद केले आहे.

यापूर्वी महापालिका रस्त्यांच्या कामासाठी थेट पेट्रोल उत्पादक कंपन्यांकडून डांबर खरेदी करीत होते. त्यामुळे महापालिकेला प्रतिटनामागे साडेसहा हजार ते 7 हजार रुपये इतकी सवलत मिळत होती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेकडून थेट कंपनीकडून केली जाणारी डांबर खरेदी बंद केली गेली. तीन वर्षांपूर्वी महापालिकेने डांबर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानंतर दरवर्षी ही निविदा काढली जात आहे. प्रत्यक्षात पुरवठादार ठेकेदाराची कंपनी या निविदेत पात्र ठरेल, अशा अटी या निविदा प्रक्रियेत टाकण्यात आल्याचा दावा निकम यांनी केला.

निकम म्हणाले, ऑगस्ट 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत आलेल्या निविदांनुसार या कालावधीत पालिकेच्या नोंदीनुसार 2 हजार 301 मेट्रिक टन डांबर खरेदी केले गेले. या खरेदीत अनेक त्रुटी आणि भ्रष्टाचार आहे. डांबराचे दर हे पंधरा दिवसांनी बदलतात. सदर ठेकेदार हा पालिकेला डांबराच्या प्रचलित दराच्या सहा टक्के कमी दराने डांबर पुरवठा करीत आहे. प्रत्यक्षात महापालिकेने थेट डांबर खरेदी केले तर आणखी कमी दराने ते उपलब्ध होऊ शकते. तसेच, पेट्रोल
उत्पादक कंपन्यांकडून पीडब्ल्यूडी विभागाला अॅप पुरविले आहे. या अॅपमध्ये कंपन्यांकडून डांबर खरेदीची माहिती चलनाद्वारे कळते. या अॅपमध्ये झालेल्या डांबराची खरेदी ठराविक भागात गेल्याची नोंद होते. कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या चलनात याची नोंद असते. या चलनातून डांबर दुसरीकडे कोठे विक्री केल्याचा प्रयत्न केला तर त्याचा तपशील दाखविते. महापालिकेला डांबरपुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापालिका आणि पीडब्ल्यूडीला विक्री केल्याचा आरोप त्यांनी केला.

कमिशनसाठी कंपनीऐवजी ठेकेदाराला प्राधान्य?

सदर ठेकेदाराकडून डांबराचा ट्रक प्लांटमध्ये पाठविला गेल्यानंतर तेथे डांबराची चोरी होते. ट्रक पूर्णपणे खाली केला जात नाही. अशाप्रकारे दहा ट्रक डांबराची चोरी झाली असून, यात पालिकेचे अधिकारी सामील असल्याचा दावा केला, तसेच, पेट्रोल उत्पादक कंपन्या या सरकारी असल्याने त्यांच्याकडून डांबर खरेदीत कमिशन मिळत नसल्याने पालिकेकडून ठेकेदारामार्फत डांबर खरेदीचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही निकम यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले? ‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले?
आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला, या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे  यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएमपासून ते मराठी...
बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात… संतोष देशमुख प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात
मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? राज ठाकरे यांचा थेट सवाल
औरंगजेबाची कबर उखडून टाकावी का? राज ठाकरे यांची पहिलीच प्रतिक्रिया काय? काय केली सूचना?
शिवाजी महाराजांसमोरच संभाजी महाराजांनी औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारली होती, राज ठाकरे यांचं मोठं विधान, शिवकालीन परिस्थिवर केलं भाष्य
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत… राज ठाकरे यांचा छावा चित्रपटानंतर झालेल्या वादावरुन जोरदार हल्लाबोल
औरंगजेबावरुन राज ठाकरे यांचे राजकारण्यांना फटकारे, काय म्हणाले पाहा ?