Rain Alert Maharashtra – 31 मार्चच्या आत शेतातील गहू, कांदे काढून घ्या! पंजाब डख यांची बळीराजाला विनंती
राज्यात 1 एप्रिलपासून ते 7 एप्रिलपर्यंत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळणार आहे, असा इशारा हवामान अंदाज वर्तवणारे पंजाबराव डख यांनी दिला आहे. पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय. सांगली, मिरज, सोलापूरमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गसह गोव्याला अवकाळी पावसाचा फटका बसला. आता हवामान अंदाज वर्तवणारे पंजाबराव डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मार्च एंड म्हणजे 31 मार्चपर्यंत आपल्या शेतात गहू, कांदे असतील तर शेतकऱ्यांनी काढून घ्यावे. कारण राज्यात 1 एप्रिलपासून ते 7 एप्रिलपर्यंत म्हणजे जवळपास सात दिवस रोज वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस पडणार आहे. सात दिवसांत आज या भागात तर उद्या दुसऱ्या भागात तिसऱ्या दिवशी वेगळ्या आणि चौथ्या दिवशी इतर भागात असा अवकाळी पाऊस पडणार आहे. मुंबई, पुण्यातही पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, खानदेश, मराठवाडा या सगळ्या भागांमध्ये रोज एक-एक दोन-दोन दिवस मुक्काम करत अवकाळी पाऊस पडणार आहे, असे पंजाबराव डख म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List