मराठी संस्कृतीचं भान ठेवा..; बिकिनीतील फोटोंमुळे ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री ट्रोल
'जीव माझा गुंतला' या मालिकेत अंतराची भूमिका साकारून अभिनेत्री योगिता चव्हाण घराघरात पोहोचली. त्यानंतर योगिताने 'बिग बॉस मराठी' या शोमध्येही भाग घेतला होता. आता योगिता तिच्या काही फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
नुकतीच योगिता इंडोनेशियातील बाली याठिकाणी फिरायला गेली होती. बालीमधल्या जिंबारन बे बीचवरील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. याच फोटोंमुळे योगिता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
योगिताने बालीच्या बीचवर पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. त्यावर तिने निळ्या रंगाचा शर्टदेखील घातला होता. मात्र बिकिनीतील फोटोंमुळे काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List