विकी कौशल मोडणार कतरिनाच्या एक्स बॉयफ्रेंडचा रेकॉर्ड; फक्त इतकी पावलं दूर

विकी कौशल मोडणार कतरिनाच्या एक्स बॉयफ्रेंडचा रेकॉर्ड; फक्त इतकी पावलं दूर

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाच्या कमाईचा वेग जरी मंदावला असला तरी प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात तो यशस्वी ठरत आहे. चौथ्या आठवड्यात ‘छावा’च्या कमाईत सतत घट झाल्याचं पहायला मिळालं. तर बुधवारी कमाईत आणखी पाच टक्क्यांची घसरण झाली. बुधवारी या चित्रपटाने 4.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. कमाईत दररोज काहीशी घट होत असली तरी हा चित्रपट आणखी एक विक्रम आपल्या नावे करण्यापासून अवघे काही पावलं दूर आहे.

‘छावा’ने देशभरात आतापर्यंत 535.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यापैकी हिंदी व्हर्जनची कमाई 524.45 कोटी रुपये इतकी आहे. तर तेलुगू व्हर्जनच्या कमाईचा आकडा 11.1 कोटी रुपये इतका आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘छावा’ने जगभरात 727.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत विकी कौशलच्या या चित्रपटाने सनी देओलच्या ‘गदर 2’, सलमान खानच्या ‘सुलतान’ आणि रणबीर कपूरच्या ‘संजू’ या चित्रपटांना मागे टाकलं आहे. तर रणबीरच्याच ‘अॅनिमल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यापासून ‘छावा’ फक्त 18 कोटी रुपये दूर आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री 2’च्या कमाईचा रेकॉर्ड मोडण्यासाठी ‘छावा’ला आणखी 63 कोटी रुपये कमवावे लागतील.

गदर 2- 686 कोटी रुपये
सुलतान- 607.84 कोटी रुपये
संजू- 438 कोटी रुपये

‘छावा’ने पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 180.25 कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात 84.05 कोटी रुपये कमावले आहेत. चौथ्या आठवड्याच्या शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत थेट 91 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. मात्र त्यानंतर कमाईचा आलेख उतरताच आहे. असं असलं तरी होळी आणि रंगपंचमीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. याशिवाय आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह, दिव्या दत्ता, सुव्रत जोशी, संतोष जुवेकर यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्यापासून कामाला लागा, महाराष्ट्रातील प्रत्येक… राज ठाकरे यांनी दिला मराठीचा नारा उद्यापासून कामाला लागा, महाराष्ट्रातील प्रत्येक… राज ठाकरे यांनी दिला मराठीचा नारा
Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025: मनसे नेते राज ठाकरे यांनी रविवारी गुढी पाडवा मेळाव्यातून विविध विषयांवर हात घातला. यावेळी...
CSK vs RR – राजस्थान रॉयल्सने अटीतटीच्या लढतीत चेन्नईवर केली मात, सीएसकेचा सलग दुसऱ्यांदा पराभव
Maharashtra Kesari 2025 : सोलापूरचा वेताळ शेळके बनला महाराष्ट्र केसरी, किताबी लढतीत पृथ्वीराज पाटीलवर केली मात
अदानी हुशार निघाला, इकडे आपण अडाणी निघालो! राज ठाकरेंचा हल्लाबोल
‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले?
बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात… संतोष देशमुख प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात
मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? राज ठाकरे यांचा थेट सवाल