Benefits Of Hot Water- सलग ३० दिवस कोमट पाणी पिल्यास शरीरामध्ये काय बदल घडतील?

Benefits Of Hot Water- सलग ३० दिवस कोमट पाणी पिल्यास शरीरामध्ये काय बदल घडतील?

फार पूर्वीपासून कोमट पाणी हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होते. आपल्या आजी आजोबांनी किंवा जुन्या जाणत्या व्यक्तींनी कोमट पाणी पिण्याचा कायम सल्ला दिलेला आहे. शरीरासाठी कोमट पाणी हे खूप गरजेचे आहे. कोमट पाणी सलग ३० दिवस पिण्यामुळे आपल्या शरीराला काय फायदे मिळतील हे बघूया.

 

आपण रोज सकाळी कोमट पाण्याची सवय लावून घेतली तर, आपला कोटा साफ व्हायला मदत होते. अनेकांना सकाळी उठल्यावर बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशांसाठी सकाळी उठून कोमट पाणी पिणे हे वरदान आहे.

 

सकाळी कोमट पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. दिवसाच्या सुरुवातीला एक किंवा दोन लीटर पाणी प्यायल्यामुळे शरीर निरोगी होण्यास मदत होते. तसेच यामुळे आपली त्वचाही उत्तम राहते. त्वचेला तजेला देण्यासाठी कोमट पाणी महत्त्वाची भूमिका बजावते.

 

पुरेशा प्रमाणात कोमट पाणी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनपासून त्वचेचे संरक्षण होते. तसेच आपली त्वचा चमकदार होते. किमान 5 लीटर पाणी आपल्या पोटात जायलाच हवे. त्यामुळे आपल्या शरीरातून टॉक्सिन बाहेर निघून जातात. तसेच आपल्या त्वचेला कोरडेपणाची समस्या असेल तर तिही समस्या दूर होते.

 

मध आणि लिंबू पाणी हा सर्वात उत्तम उपाय आहे. यामुळे आपल्या शरीरातून टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यासही हे पाणी खूपच उपयुक्त आहे. मधामध्ये एंटी-एजिंग पोषक तत्वे असतात, त्याचबरोबरीने लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले? ‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले?
आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला, या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे  यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएमपासून ते मराठी...
बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात… संतोष देशमुख प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात
मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? राज ठाकरे यांचा थेट सवाल
औरंगजेबाची कबर उखडून टाकावी का? राज ठाकरे यांची पहिलीच प्रतिक्रिया काय? काय केली सूचना?
शिवाजी महाराजांसमोरच संभाजी महाराजांनी औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारली होती, राज ठाकरे यांचं मोठं विधान, शिवकालीन परिस्थिवर केलं भाष्य
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत… राज ठाकरे यांचा छावा चित्रपटानंतर झालेल्या वादावरुन जोरदार हल्लाबोल
औरंगजेबावरुन राज ठाकरे यांचे राजकारण्यांना फटकारे, काय म्हणाले पाहा ?