Hair Conditioner- केसांना दररोज कंडिशनर लावणे योग्य आहे का? वाचा सविस्तर
प्रत्येक ऋतूत केसांची काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळा आला आहे आणि अशा परिस्थितीत त्वचेसोबतच केसांचीही अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. केस शाम्पूने धुतल्यानंतर, कंडिशनर काही वेळ केसांवर लावावे लागते आणि नंतर केस धुवावे लागतात. तज्ञांचे म्हणणे आहे की कंडिशनरमध्ये अनेक प्रकारची रसायने असतात. कोणत्याही प्रकारचे केमिकल अति प्रमाणात केसांना लावल्यानंतर, केसांची हानी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच केसांना अधिक प्रमाणात कंडिशनिंग हे हानीकारक ठरु शकते.
दररोज कंडिशनर लावल्याने केस चिकट होऊ शकतात. याशिवाय, कंडिशनरमध्ये असलेले रसायने केसांना नुकसान पोहोचवू शकतात. त्याच वेळी, जर तुमचे केस आधीच तेलकट असतील तर दररोज कंडिशनर लावल्याने केसांमध्ये जास्त तेल जमा होऊ शकते.
केस जाड असतील तर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा कंडिशनर वापरू शकता. केस गळण्याची समस्या असेल तर कोणत्याही प्रकारचे कंडिशनर वापरू नका.
कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत
केसांच्या लांबीपासून टोकापर्यंत कंडिशनर वापरावे.
अति प्रमाणात कंडिशनर लावणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते. नेहमी कमी प्रमाणात कंडिशनरचा वापर करावा.
कंडिशनर लावल्यानंतर काही मिनिटे केसांवर तसेच ठेवल्याने खूप चांगले परिणाम मिळतात.
केस कोरडे आणि कुरळे असतील तर आठवड्यातून २ ते ३ वेळा कंडिशनर वापरणे फायदेशीर ठरू शकते. पण जर तुमचे केस तेलकट असतील तर ते मर्यादित प्रमाणात वापरा.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List