IPL 2025 – कोणता संघ वरचढ ठरणार? हैदराबाद की लखनऊ? खेळपट्टी काय सांगते, जाणून घ्या एका क्लिकवर
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर आज सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात तुंबळ युद्ध होणार आहे. हैदराबादचा संघ सध्या जोरदार फॉर्मास असून त्यांनी पहिल्याच सामन्यात धुवाँदार फलंदाजी करत राजस्थानविरुद्ध 286 धावा केल्या होत्या. दुसरीकडे ऋषभ पंतचा लखनऊला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
घरच्या मैदानावर सामना होत असल्यामुळे हैदराबादला नक्कीच फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच राजीव गांधी स्टेडियमची खेळपट्टी सपाट असल्यामुळे त्याचा फलंदाजांना चांगलाच फायदा मिळतो. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघला मोठी धावसंख्या उभारण्याची चांगली संधी असणार आहे. तसेच जसजस खेळ पुढे सरकतो तसतस या खेळपट्टीवर फिरकीपट्टूंना मदत मिळण्यास सुरुवात होते. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. हैदराबादमध्ये आतापर्यंत आयपीएलचे 78 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 43 सामन्यांमध्ये आव्हानाचा पाठलाग करणारा संघ विजयी ठरला आहे. तसेच 35 वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी ठरला आहे.
हैदराबाद आणि लखनऊ यांच्यामध्ये आतापर्यंत या मैदानावर दोन सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघांनी 1-1 वेळा विजय संपादित केला आहे. मात्र सध्याच्या घडीला दोन्ही संघांपैकी हैदराबादचा संघ चांगल्या लयीत दिसत आहे. तसेच घरच्या मैदानावर सामना होत असल्यामुळे चाहत्यांचा पाठिंबा सुद्धा हैदराबादच्या पाठिशी असणार आहे. दोन्ही संघांमध्ये विस्फोटक फंलादाजांचा भरणा असल्यामुळे चाहत्यांना चौकार आणि षटकारांची आतषबाजी पहायला मिळेल. हैदराबादच्या संघात शतकवीर ईशान किशन, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि नितेश रेड्डी सारखे विस्फोटक फलंदाज आहेत. तसेच लखनऊच्या संघात कर्णधार ऋषभ पंत, निकोलस पुरन, मिचेल मार्श, डेव्हिड मिलर आणि मार्कस स्टॉयनिस सारखे दमदार फलंदाज आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List