त्याला चिडवून झालं! आता पुरे! आता त्याला जवळ घ्या… संतोष जुवेकरच्या बचावासाठी प्रसिद्ध संगीतकाराची धाव

त्याला चिडवून झालं! आता पुरे! आता त्याला जवळ घ्या… संतोष जुवेकरच्या बचावासाठी प्रसिद्ध संगीतकाराची धाव

बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची घोडदौड महिन्याबरानंतरही सुरूच असून बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलावंतानीही महत्वाच्या भूमिका सााकरल्या असून त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर. यामध्ये तो रायाजी या पात्राच्या भूमिकेत दिसला, त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. त्याच्या आणि विकी कौशलच्या मैत्रीचे किस्सेही चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या अनेक कलाकारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. संतोषनेही अनेक मुलाखती दिल्या, मात्र त्याच दरम्यान त्याने एका मुलाखतीत जे वक्तव्य केलं त्यावरून त्याच्यावर बरीच टीका झाली, ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

‘छावा’ मध्ये विकी कौशलची प्रमुख भूमिका असून तर रश्मिका मंदाना येसुबाईंच्या भूमिकेत दिसली. क्रूरकर्मा, मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेता अक्षय खन्ना दिसला. त्याचसंदर्भात संतोषने एका मुलाखतीत विधान केलं होतं. ‘मी अक्षय खन्नाशी बोललोच नाही’ असं संतोष जुवेकर एका मुलाखतीत म्हणाला होता. आणि मुलाखतीचा तो पार्ट बघता बघता व्हायरल झाला, वाऱ्याच्या वेगाने पसरला आणि लोकांनी त्यावरून संतोषवर खूप टीका केली. त्याचा रो ल केवढा, तो बोलतो किता असं म्हणत त्याची खिल्ली उडवली.

या ट्रोलिंगनंतर संतोषने आपली बाजू मांडली. “अक्षय खन्ना हा माझाही आवडता अभिनेता आहे. आता ट्रोल झालोय म्हणून असं बोलतोय असं नाहीये. लोक म्हणतील की आता सारवासारव करायला आला. पण लोक अर्धवट गोष्टी ऐकतात किंवा मला जे बोलायचं होतं ते चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलं”, असं जुवेकर म्हणाला होता.

प्रसिद्ध संगीतकाराची बचावासाठी धाव 

दरम्यान आता संतोषच्या एक मित्राने, प्रसिद्ध संगीतकार आणि दिग्दर्शकानेही त्याच्या बचावासाठी धाव घेतली आहे. संगीतकार, गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते याने फेसबूकवर एक भलीमोठ्ठी पोस्ट संतोषबद्दल लिहीली आहे. सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाच्या अभिनेत्याविरुद्ध विधान करण्याचे धाडस दाखवले. संतोषने देखील त्याबाबत कुठेही तक्रार न नोंदवता खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन केले. पण त्यानंतर वडाच्या झाडावर उगवलेल्या बाकीच्या पिंपळाच्या वेलींनी आता थांबायला हवं. आता आजूबाजूच्या मराठी अभिनेत्यांचे कौतुक करण्याची वेळ आली आहे. तिथे कमी पडून कमावलेलं घालवू नका. कुटुंबातील सोहळा आहे. एखादा कुटुंबीय विचित्र नाचला. त्याला चिडवून झालं! आता पुरे! आता त्याला जवळ घ्या, असं म्हणत अवधूते संतोषची बाजू घेतली आहे.

काय आहे अवधूत गुप्तेची पोस्ट ?

मित्रांनो!

सर्वप्रथम माझा मित्र संतोष जुवेकर ह्याचे ‘छावा‘ ह्या चित्रपटातील काम बघून तुम्ही जी त्याची स्तुती केलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद!!

आता.. गेल्या दोन आठवड्यांपासून त्याला जे ट्रोल करता आहात त्याबद्दल थोडसं..

“अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत असल्यामुळे मला त्याच्याशी बोलावसंच वाटलं नाही” हे त्याचं वक्तव्य कुणालातरी खरोखरच हास्यास्पद वाटू शकतं. पण, त्यावर हसण्याआधी जरा संतोषच्या आधीच्या कारकिर्दीकडे बघणं गरजेचं आहे.
‘झेंडा‘ च्या वेळेस ‘संत्या‘ च्या भूमिकेच्या मुळातच खूप जवळ असलेला संतोष, केवळ अजून त्यात शिरता यावं म्हणून संपूर्ण चित्रिकरणा दरम्यान त्या चाळीतच राहिला होता. ‘मोरया‘ च्या वेळेस देखील तसंच. ‘एकतारा‘ हा चित्रपट गायकाच्या आयुष्यावर आधारित. त्या भूमिकेसाठी संतोष साधारणपणे वर्षभर गायन आणि गिटार वाजवणे शिकत होता. त्या वर्षातल्या माझ्या जवळपास सर्व कार्यक्रमांना केवळ ऑब्जर्व करण्यासाठी तो माझ्याबरोबर फिरत होता. हे माझ्या सोबतच्या चित्रपटांचे झाले. परंतु, इतर दिग्दर्शकांबरोबर इतर चित्रपटांसाठी देखील काम करताना, भूमिकेसाठी तितकाच वेडेपणा त्याने केलेला मी फार जवळून बघितलेला आहे. आता हीच जर त्याची ‘मेथड‘ असेल तर ती आपण सर्वांनी एक्सेप्ट करायलाच हवी.. कारण ‘रिझल्ट‘ आपण बघितलेला आहे आणि तो निर्विवाद आहे!

अभिनयाच्या ह्याच वेडापाई संतोष आजही एकटा राहतो. अर्थात, एकटा राहत असून सुद्धा त्याच्या एकट्याचा संसार हा दृष्ट लागण्यासारखा आहे! त्याचं घर कधीही जाऊन बघा.. एखाद्या गृहिणीला लाजवेल असं टापटीप असतं! त्यातच, तो जवळ रहाणाऱ्या स्वतःच्या आई-वडिलांची, अधिक पुतणीची काळजी देखील घेतो. कुठल्याही मराठी अभिनेत्याच्या नशिबी असलेली दुर्दैवी काटकसर त्याच्याही नशिबी आहे. परंतु, आजवर संतोषने कुणाचे पैसे बुडवल्याची किंवा नको ती देणी करून ठेवल्याची तक्रार आजवर कधीही ऐकलेली नाही.
अशा सोन्यासारख्या माणसाने आणि हाडाच्या अभिनेत्याने एखाद्या चित्रपटानंतर थोडे जास्त श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याची खिल्ली उडवली गेली. पण सहाराच्या वाळवंटामध्ये भर उन्हात पळत राहावे आणि सतत पाणी म्हणून जे भासते, त्याच्या जवळ गेल्यावर ते मृगजळ निघावे.. असा प्रवास केलेल्या माणसाला खरोखर जर एखादा चवदार पाण्याचा तलाव मिळाला तर.. त्याचे वेड्यासारखे नाचणे हे हास्यास्पद म्हणावे की केविलवाणे?

ही शोकांतिका केवळ संतोष जुवेकरचीच नव्हे तर मराठीतल्या अनेक कलावंतांची आहे. वर्ष भर मेहनत करून एका शुक्रवारी चित्रपट येतो आणि शनिवारी एखादा मित्र किंवा फॅन त्याला विचारतो की “बाकी.. नवीन काय करतोयस?” त्यावेळेसचे त्या कलाकाराचे दुःख मीम करणाऱ्याला कधीच कळणार नाही. कारण दगडावर उमलू पाहणाऱ्या फुलाचा संघर्ष कबरी वरच्या बुरशीला कसा कळणार?

त्यातून, ज्या काही लोकांनी पहिली मीम केली त्यांचं खरोखरीच कौतुक आहे कारण त्यांनी प्रवाहच्याविरुद्ध, अर्थात सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाच्या अभिनेत्याविरुद्ध विधान करण्याचे धाडस दाखवले. संतोषने देखील त्याबाबत कुठेही तक्रार न नोंदवता खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन केले. पण त्यानंतर वडाच्या झाडावर उगवलेल्या बाकीच्या पिंपळाच्या वेलींनी आता थांबायला हवं.

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत एका अमराठी अभिनेत्याचा खुल्या दिलानं स्विकार करून तुम्ही तुमचं मोठं मन दाखवून दिलं आहे. आता आजूबाजूच्या मराठी अभिनेत्यांचे कौतुक करण्याची वेळ आली आहे. तिथे कमी पडून कमावलेलं घालवू नका.

कुटुंबातील सोहळा आहे. एखादा कुटुंबीय विचित्र नाचला. त्याला चिडवून झालं! आता पुरे! आता त्याला जवळ घ्या. एवढंच!

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अणुशक्ती विभाग स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे शिवजयंती उत्साहात, छत्रपती शिवरायांचा जयघोष, बाईक रॅली, पोवाडे अणुशक्ती विभाग स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे शिवजयंती उत्साहात, छत्रपती शिवरायांचा जयघोष, बाईक रॅली, पोवाडे
अणुशक्ती विभाग स्थानीय लोकाधिकार समिती बीएआरसी तारापूरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये सुमारे दोन हजार शिवभक्तांची...
चढ-उतारानंतर शेअर बाजार सावरला
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक; 3 दहशतवादी ठार तर, 3 जवानही शहीद
IPL 2025 – मिचेल मार्श आणि निकोलस पुरनचा वादळी धमाका, लखनऊचा हैदराबादवर 5 विकेटने विजय
मंत्रालयात प्रवेशासाठी अत्याधुनिक प्रणाली, आता मंत्रालयात जाताना अवलंबन करावी लागणार ही पद्धत
‘…तर आदित्य ठाकरे यांची देखील नार्को टेस्ट करायला पाहिजे’; दिशा सालियन प्रकरणात कदमांची मोठी मागणी
India Tour Of England- इंग्लंड दौऱ्यातून रोहित शर्मा आऊट? विराट कोहलीही मुकण्याची शक्यता