शाहरुख खानच्या कष्टाची पहिली कार, पण बँकेने का केली जप्त?
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान म्हणजे म्हणजे लाखो- करोडो दिलो की धडकन आहे. त्याने जे काही यश मिळवलं आहे ते त्याच्या कष्टाने मिळवलं आहे. त्याने दिवस-रात्र मेहनत करून ही हे प्रेम, यश मिळवलं आहे. एकेकाळी ज्याला राहायला घर नव्हत तो आता करोडोंचा मालक आहे. आलिशान मन्नतसह अनेक प्रॉपर्टी त्याच्या नावावर आहेत. त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्याही आहेत.
कष्टाने घेतलेली कार बँकेनं जप्त केली
पण एक काळ असा होता की तो एका दिवसात 2-3 शिफ्टमध्ये काम करायचा. याच कष्टातून त्याने स्वत:साठी आवडीने एक कार विकत घेतली होती. ती त्याची पहिली कार होती. पण एवढ्या कष्टाने घेतलेली कार बँकेनं जप्त केली. नक्की काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात.
शाहरुखने कष्टाने घेतलेली त्याची पहिली कार बँकेला परत द्यावी लागली होती. काही महिन्यातच बँकेने त्याची कार जप्त केली. हा किस्सा शाहरुखची खास मैत्रीण जुही चावलाने एका मुलाखतीत सांगितला होता. शाहरुख खान आणि जुही चावला यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. डर, राजू बन गया जेंटलमन, डुप्लिकेट, येस बॉस, फिर बी दिल है हिंदुस्तानी अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्यासोबतच ते आता बिझनेस पार्टनरही आहेत. दोघांनी मिळून IPL संघ कोलकाता नाईट रायडर्स विकत घेतला आहे.
कारचा EMI थकल्याने बँकेकडून कार जप्त
एका कार्यक्रमात जुही चावलाने शाहरुख खानच्या संघर्षाबद्दल त्याच्या स्वप्नांसाठी केलेली त्याची मेहनत याबद्दल तिने सर्वच खुलासा केला होता. जुहीने सांगितले होते की, शाहरुखने एकदा काळ्या रंगाची जिप्सी खरेदी केली होती. पण स्ट्रगलच्या दिवसांमध्ये शाहरूखला कारचा इएमआय भरणे शक्य न झाल्याने बँकेने ती कार जप्त केली. तो दिवस शाहरूखसाठी फारच वेदनादायक होता.
शाहरुख खूप दुःखी मनाने शूटिंगला आला होता
जुहीने हा किस्सा सांगताना म्हटलं की,शाहरुख खूप दुःखी मनाने शूटिंगला आला होता. त्याच्या कष्टाची ती पहिली कार होती. पण असं झाल्याने तो निराश झाला होता आणि थोडा खचला होता. तेव्हा जुहीने त्याची समजूत काढत तो पुढे भविष्यात अनेक गाड्या खरेदी करेल असा विश्वास त्याला दिला. आणि आजही शाहरुखला तो क्षण आठवतो कारण जुहीचे म्हणणे कुठेतरी खरे झाले होते.अखेर त्याने त्याच्या संघर्षाच्या जोरावर अनेक कार, घर आणि लोकांची मने जिंकली.
आता शाहरुख खान अनेक आलिशान वाहनांचा मालक आहे. समुद्राजवळील मन्नत या बंगल्यात तो आपल्या कुटुंबासह राहतो. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान लवकरच सुहाना खानसोबत ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी शाहरुख खानने तयारी सुरू केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List