‘उद्धव ठाकरेंनीच माझ्यासाठी निरोप पाठवला होता, नार्वेकर…’, चित्रा वाघ यांचा मोठा गौप्यस्फोट
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये आरोप -प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, चित्रा वाघ या पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील आल्या होत्या असंही अंधारे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ?
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आताचे आमदार मिलिंदजी नार्वेकर यांच्याकडे निरोप पाठवला होता. चित्राताई एकदा येऊ भेटा. तुमच्या सारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे, मी जाणं न जाणं हा नंतरचा भाग होता. पण त्यांच्या शब्दाला मान म्हणून मी नक्की गेले होते. मी नव्हते गेले तर त्यांनी मला बोलावलं होतं. आणि याचा खरेपण म्हणजे एकनाथ शिंदे साहेब पण होते. त्यांनी मला सांगितलं की एकनाथ शिंदे हे सर्व कोऑर्डिनेट करतील, त्यामुळे मिलिंदजी मला दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील घेऊन गेले. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं मला ठरवू द्या मी अजून विचार केलेला नाही. तेव्हा ते मला म्हणाले नाही-नाही तुम्ही आमच्या पक्षात याच. त्यावेळी तिथे आदित्य ठाकरे देखील होते, असा खुलासा यावेळी चित्रा वाघ यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यांची लायकी तीच आहे, आणि ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो, त्यांनी काल ज्या पद्धतीनं माझ्यावर ट्विट केलं. ते नेहमीच करतात. माझ्या कॅरेक्टरवर सतत बोलण्याचा प्रयत्न असतो. वेडं-वाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो. आता विरोधी पक्षातले आधीचे सगळे बोलून -बोलून थकले. आता हे सुरू झाले आहेत. मला प्रश्न असा पडला आहे की हे आणखी किती वर्ष प्रश्न विचारणार. माझ्या कॅरेक्टरला धरून जे विचारलं जातं, जे बोललं जातं, ज्या पद्धतीने बोललं जातं. माझा एक प्रश्न आहे. तुम्ही काय समजता स्वत: ला. तुम्ही आहात कोण? तुमची लायकी काय असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List