Menstrual cycle- मासिक पाळीच्या दिवसात स्वतःच्या स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी?

Menstrual cycle- मासिक पाळीच्या दिवसात स्वतःच्या स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी?

मासिकपाळीच्या स्वच्छतेसाठी सॅनिटरी नॅपकीन्स,टेम्पॉन्स,मॅन्युस्टरल कप ही साधने सहज उपलब्ध असतात. साधारपणे भारतामध्ये तरुण अविवाहित मुली सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात. ज्यांचा मासिक रक्तस्त्राव कमी प्रमाणात असतो त्या टेम्पॉन्स वापरु शकतात. त्याचप्रमाणे काहीजणी त्यांच्या मासिक पाळीचा दिवस व फ्लोनूसार वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटरी नॅपकीन अथवा इतर साधने वापरतात.

सध्याच्या घडीला अनेक महिला या मासिक पाळीत वापरणा-या साधनांच्या प्रकार व ब्रॅन्ड बाबत अधिकच जागरुक असतात. तुमच्या गरजेनूसार एकाच प्रकारची व ब्रॅन्डची ही सुरक्षेची साधने निवडणे हा उत्तम पर्याय असू शकतो. सतत निरनिराळे ब्रॅन्ड वापरल्यामुळे गैरसोय होऊ शकते.

मासिक पाळी दरम्यान वापरण्यात येणारी स्वच्छता साधने वारंवार बदलणे आवश्यक आहे. तुम्हाला कमी रक्तस्त्राव होत असेल किंवा तुमचे सॅनिटरी पॅड खराब झाले नसेल तरी तुम्ही स्वच्छता साधने वेळेवर बदलणे गरजेचे आहे. कारण असे न केल्यास तुम्हाला मूत्रमार्गातील इनफेक्शन,वजानल इनफेक्शन आणि त्वचेवर रॅशेस येण्याची शक्यता असते. त्यामुळे दर  सहा तासांनी सॅनिटरी पॅड व दर दोन तासांनी टेम्पॉन्स बदलणे योग्य असू शकते.

 

थोडक्यात ज्यांना अती रक्तस्त्राव होतो त्यांची ही साधने बदलण्याची वेळ ही अजून कमी असू शकते तर ज्यांना कमी रक्तस्त्राव होतो त्यांनी ही वेळ वाढवण्यास हरकत नाही. पण वेळ ठरवल्यानंतर एखाद्या दिवशी तुम्हाला कमी रक्तस्त्राव झाला तरी तुम्ही तुमचे पॅड बदलणे आवश्यक आहे.

 

टेम्पॉन्स वापरताना याची विशेष दक्षता घ्या कारण ते योनीमार्गात आत बसवावे लागतात.त्यामुळे ते वरचेवर बदलले नाही तर जंतुसंसंर्ग होऊन टॉक्सिक शॉक सिन्ड्रोम टीएसएस सारखे गंभीर विकार होऊ शकतात. या विकारावर लवकर उपचार न झाल्यास ही समस्या प्राणघातक असू शकते. 

(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य
राज्यात एआयमुळे (AI) मुळे बेरोजगारी वाढू शकते, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत व्यक्त...
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग