मुंबईतल्या आदिवासी पाड्यांच्या विकासाबाबत लवकरच बैठक
मुंबईत 27 आदिवासी पाडे आहेत. या पाडयांना सुविधा नाही. या पाड्यांचा विकास करण्यासाठी निधी कमी पडत आहे. ठक्कर बाप्पा योजनेतून या पाडय़ांसाठी निधी देण्याची मागणी शिवसेना आमदार बाळा नर यांनी आज विधानसभेत केली. त्यावर आदिवासी पाड्यांच्या विकासाच्या संदर्भात लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.
आदिवासी पाड्यांच्या विकासावरील तारांकित प्रश्नावरील चर्चेत भाग घेतला त्यांनी मुंबईतल्य आदिवासी पाडय़ांचा विषय मांडला. या आदिवासी पाडय़ांचा विकास केला तर पर्यटकही येतील. या आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना कसायल जमिनी दिल्या आहेत त्याचा शेतसाराही भरत आहेत. पण जातीच्या दाखल्यासाठी या पाडय़ांवरील रहिवाशांकडे 1950चे पुरावे मागत आहे. त्यामुळे पूर्वी रहिवाशांचे पंचनामे करून जातीचे दाखले दिले जात होते. पण ही पद्धत बंद केल्यामुळे त्यांना असुविधांना तोंड द्यावे लागत असल्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List