जळगावच्या चोपडा एसटी बसस्थानकात गुजरात पॅटर्न, बसपोर्टच्या धर्तीवर विकास

जळगावच्या चोपडा एसटी बसस्थानकात गुजरात पॅटर्न, बसपोर्टच्या धर्तीवर विकास

राज्यातील एसटी स्थानकांचा बीओटी ( बांधा वापरा आणि हस्तांतरित करा) तत्वावर विकास करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. या निविदांमध्ये सुरुवातीला जळगावच्या चोपडा एसटी बसस्थानकाचा कायापालट होणार असून या स्थानकाचा बसपोर्टच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी आणि अंबोली या बसस्थानकांचाही विकास करण्यात येणार असल्याची माहीती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. अलिकडे परिवहन मंत्र्यांनी गुजरात येथील बसस्थानकांच्या बसपोर्ट म्हणून झालेल्या विकासाची पाहणी केली होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

बसस्थानकांचे ‘बीओटी’वर अत्याधुनिकीकरण

राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांना अत्याधुनिक करण्याचे धोरण यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सादर केले. राज्यातीस सर्व बसस्थानकांना बीओटी तत्वावर अत्याधुनिक केले जाणार आहे. शहर, तालुका आणि ग्रामीण भागातील एसटीच्या सेवेचा दर्जा सुधारण्याबरोबर ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि अंबोली या बसस्थानक विकास होणार आहे. आंबोली येथील बसस्थानक पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने तेथे सर्व सुविधा युक्त नवीन बसस्थानक बांधण्यात यावे अशी मागणी यावेळी माजी मंत्री दिपक केसरकर यांनी केली. त्यास परिवहन मंत्र्यांनी तत्वत: मंजूरी दिली आहे

सिल्लोड बसस्थानकासाठी रस्ता बांधणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. याबाबत लवकरच निर्णय घेऊन बसस्थानकात पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले.

चोपडा बसस्थानकात अत्याधुनिक बसपोर्ट

जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाला बसपोर्टच्या धर्तीवर विकसित करावी अशी मागणी यावेळी स्थानिक आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी केली. मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेला चोपडा हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील महत्वाचे बसस्थानक म्हणून चोपडा बसस्थानकाला अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त बनविण्याची मागणी यावेळी सोनावणे यांनी केली. चोपडा बसस्थानकाच्या विकासासंदर्भात लवकरच निविदा प्रक्रिया राबवून बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हे बसस्थानक विकसित करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रवींद्र कुमारचे कारनामे उघड; दिवसाला 50 हून अधिक चॅटिंग आणि कॉलिंग आयएसआय एजंट नेहाच्या जाळ्यात अडकला रवींद्र कुमारचे कारनामे उघड; दिवसाला 50 हून अधिक चॅटिंग आणि कॉलिंग आयएसआय एजंट नेहाच्या जाळ्यात अडकला
पाकिस्तानची गुप्तचर संस्थेची आयएसआय एजंट नेहाला माहिती पुरवणारा फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरीतील चार्जमन रवींद्र कुमार याला नुकतीच अटक झाली. त्याच्या अटकेनंतर...
सीमा हैदर आणि सचिनला ‘मुलगी झाली हो’!
धार्मिक भावना दुखावल्या; भाजप खासदार हेमा मालिनी यांच्याविरुद्ध तक्रार
नोव्हेंबरमध्ये लग्न डिसेंबरमध्ये विभक्त; रान्या रावच्या नवऱ्याचा दावा
मूल नको! अमेरिकेत जन्म दर घटला; मिलेनियल्स आणि जेन झेडची मानसिकता
नोकरी! बीएसएफमध्ये 1760 पदांची भरती सुरू
अॅमेझॉन 14 हजार कर्मचाऱ्यांना काढणार