Aditya Thackeray News : एका मंत्र्याचा राजीनामा नको, संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राची परिस्थिती पाहता हे संपूर्ण सरकार बरखास्त व्हायला पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी परिस्थिती आली आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, या घटनेला 3 महीने झाले आहेत. तरीही काहीही झाले नाही. काल समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून मन सुन्न झालं आहे. डोळ्यात पाणी आलं होतं. सगळेच हादरून गेलेले आहेत. त्यांच्या परिवाराचे काय होत असेल याचा विचार देखील करवत नाही. काल मुख्यमंत्री एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्र्याकडे गेले. तिथे बैठक झाली. मुख्यमंत्री बोलवून नाही घेऊ शकत. राजीनामा मागवून घ्यायला हवा होता. भाजपची एक टॅगलाईन होती की महाराष्ट्र थांबणार नाही. हा महाराष्ट्र ज्यात गुन्हेगारी सुरू आहे तो आता थांबलाच पाहिजे. हे थांबवलाच गेलेच पाहिजे. फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन चालणार नाही. हे संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे, असं आदित्य ठाकरेंनी म्हंटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List