रवींद्र कुमारचे कारनामे उघड; दिवसाला 50 हून अधिक चॅटिंग आणि कॉलिंग आयएसआय एजंट नेहाच्या जाळ्यात अडकला
पाकिस्तानची गुप्तचर संस्थेची आयएसआय एजंट नेहाला माहिती पुरवणारा फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरीतील चार्जमन रवींद्र कुमार याला नुकतीच अटक झाली. त्याच्या अटकेनंतर आता अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. रवींद्र कुमार एजंट नेहासोबत दिवसाला 50 हून अधिक चॅटिंग करायचा. ती कधी व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलवरूनही माहिती मिळवायची, अशी गंभीर बाब चौकशीतून उघड झालीय.
पाकिस्तानी एजंट कथित नेहा शर्मा हिने जून 2024 पासून रवींद्र कुमारशी संपर्क केला. रवींद्र कुमारने ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काढलेला स्वतःचा पह्टो फेसबुकला शेअर केला होता. तो पह्टो बघून नेहाने त्याला संपर्क साधला होता. तिने हळूहळू रवींद्रकडून ऑर्डनन्स फॅक्टरीशी संबंधित माहिती मिळवायला सुरुवात केली. दिवसाला ती अनेक वेळा मेसेज करायची. तिच्या फ्रेंडलिस्टमध्ये हिंदुस्थानातील इतर लोक होते. त्यामुळे रवींद्रने तिच्यावर विश्वास टाकला.
फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरीत गगनयान, ड्रोन, भूदल आणि वायुदलाच्या प्रोजेक्टसंबंधित उपकरणे तयार केली जातात. आयएसआय एजंट नेहा या सगळ्याची माहिती घेत होती. काही कागदपत्रे अशी होती, जी चार्जमनकडे नव्हती, ती कुठून आली? ती कागदपत्रे चार्जमनला कोण देत होते? याचा तपास केला जात आहे. रवींद्र कुमारचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून त्याची बँक खाती तपासली जात आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List