Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

आजचे पंचाग

तिथी – फाल्गुन कृष्ण पंचमी
वार – बुधवार
नक्षत्र – विशाखा
योग – हर्षण
करण – कौलव
राशी – तूळ,दुपारी 2. 07 नंतर वृश्चिक

मेष

मेष राशीसाठी आजचा दिवस दुपारपर्यंत चांगला आहे. मात्र, दुपरी 2 वाजेनंतर चंद्र अष्टम स्थानात जात असल्याने प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे. अतिकाम किंवा धावपळ, दगदगीमुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे. विनाकारण वादविवाद टाळत व्यवसाय वाढीसाठी येणाऱ्या चांगल्या संधीचा फायदा घेण्याकडे लक्ष द्यावे. मन शांत ठेवत येणाऱ्या संधीचा फायदा करून घ्या. काही कारणाने नैराश्य येण्याची शक्यता आहे. मात्र, एकादश स्थानात शनि आणि द्वितीय स्थानात गुरु असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आज दुपारनंतर चांगला दिवस आहे. दुपारनंतर कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळणार असल्याने मनावरील ताण कमी होणार आहे. चंद्र सप्तम स्थानात असल्याने व्यवसायवाढीसाठी चांगला काळ आहे. दुपरापर्यंत कामे विनाकारण रखडत असल्याने दिसून येणार आहे. मात्र, दुपारनंतर प्रयत्न वाढवण्यास कामे मार्गी लागणार आहेत. व्यवसायात भागीदाराकडून आणि घरात कुटुंबीयांकडून चांगली साथ मिळणार आहे. आय स्थानात राहू असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. प्रथम स्थानात गुरुमुळे नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. मनावर संयम ठेवण्याची गरज आहे.

मिथुन

मिथुन राशीला आजचा दिवस सावध राहावे लागणार आहे. दुपारनंतर चंद्र षष्ठात जात असल्याने घरातील कामात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चंद्र शत्रू स्थानात असल्याने ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र, मनावरील दडपण दूर करत संयमाने काम केल्यास आजचा दिवस समाधानात जाणार आहे. दशम स्थानात राहू असल्याने कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. मात्र, कार्यस्थळी तुमचा चांगला प्रभाव वाढत असल्याने मनासारखी कामे होणार आहेत. भाग्य स्थानातील शनिमुळे अनेक चांगल्या गोष्टी जुळून येणार आहेत.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे. चंद्र पंचमात नातलगांकडून किंवा मुलांकडून शुभ समचारा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे. आता चांगला काळ असून त्याचा चांगला फायदा करून घेण्याचा काळ आहे. अडीची संपत असल्याने विनाकारण मनावर आलेले दडपण दूर होणार आहे. भाग्य स्थानात राहू असल्याने नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. आय स्थानात गुरु असल्याने उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्याची शक्यता आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस कौटुंबीक समाधान देणारा आहे. चंद्र चतुर्थ स्थानात असल्याने गृहखरेदी आणि वाहनखरेदीचे योग तयार होत आहे. घरासाठी एखादी वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. गुरुच्या पाठबळामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. चंद्राची दृष्टी कर्म स्थानावर असल्याने रखडल्याने कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. गुरु कर्म स्थानात असल्याने कार्यक्षेत्रावर प्रभाव निर्माण होणार आहे.

कन्या

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस मानसन्मान वाढवणारा आहे. चंद्र तृतीय स्थानात असल्याने सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचे योग आहेत. तसेच संयमाने कामे केल्यास नशिबाची साथही मिळणार आहे. भाग्य स्थानात गुरु असल्याने लाभदायक घटना घडण्याचे योग आहेत. मात्र, आलेल्या संधीचा फायदा करून घेण्याची गरज आहे. सप्तम स्थानात राहू असल्याने व्यवसायात तोटा होणार नाही, याची काळजी घ्यावी. शनी षष्ठ स्थानात असल्याने स्पर्धापरीक्षांसाठी हा काळ चांगला आहे. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. आता मनासारख्या गोष्टी होण्यास सुरुवात होत आहे. उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार असल्याने कामे झपाट्याने मार्गी लागणार आहेत. चंद्र द्वितीय स्थानात असल्याने धनलाभाचे योग असून काही फायद्याचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्याही कामात अतिआत्मविश्वास टाळण्याची गरज आहे. दशम स्थानात गुरु असल्याने अनेक कार्यक्षेत्रात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. षष्ठ स्थानात राहूमुळे काही अडचणी येण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीबाबत विचार करण्यास चांगला काळ आहे. त्यामुळे आजचा दिवस लाभाचा ठरण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीने आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे. दुपारनंतर वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. विनाकारण होणारी चिडचीड आणि मनस्ताप कमी होण्याची शक्यता आहे. व्यय स्थानातून प्रथम स्थानात चंद्र येत असल्याने आत्मविश्वासात वाढ होणार आहे. उत्साहाच्या भरात कोणतेही काम स्वतःवर ओढवून घेऊ नका. शनीची अडीची संपत आल्याने संकटातून मार्ग सापडणार आहेत. मात्र, आता आठवडाभर मनावर संयम ठेवल्यास वागणे हिताचे आहे. आता चांगले दिवस सुरू होणार असल्याने मनात सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे.

धनु

धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस सावध राहण्याची गरज आहे. चंद्र आय स्थानातून व्यय स्थानात येणार असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात कामांचे कौतुक होणार आहे. कोणलाही उधार पैसे देऊ नये, तसेच महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलण्याची गरज आहे. मानावर विनाकारण दडपण येण्याची शक्यता आहे. मात्र, ताणतणाव दूर करत या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. चतुर्थ स्थानात राहूमुळे घरासाठी किंवा वाहनावर खर्च वाढणार आहेत. शनीची चांगली साथ मिळणार असली तरी षष्ठ स्थानातील गुरुमुळे काहीजण कामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

मकर

मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे. आय स्थानात चंद्र असल्याने लाभाचे योग तयार होत आहेत. मात्र, हातात पैसे आले तरी त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. त्याचा पुढील काळात फायदा होणार आहे. कर्म स्थानात शनी असल्याने कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. तसेच सहकाऱ्यांकडून वेळेत काम करून घेतल्याने तुमचा ताण वाढणार नाही. तृतीय स्थानातील राहूमुळे बदनामी होणार नाही, याची काळजी घ्यावी. साडेसातीचा काळ संपत असल्याने नव्या योजनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या संधीचा फायदा घेण्याची गरज आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस कामात जाणार आहे. मात्र, सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार असल्याने कामाचा ताण जावणार नाही. चंद्र कर्म स्थानात असल्याने कामाचे योग्य नियोजन करून पुढे जावे लागणार आहे. अन्यथा कमाचा ताण वाढत जाण्याची शक्यता आहे. गुरु सप्तम असल्याने व्यवसाय आणि भागीदारीतून फायद्याचे योग आहेत. दुसऱ्या स्थानात राहू असल्याने कुटुंबीयांचे चांगले सहकार्य मिळणार आहे. तसेच घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे. आता साडेसातीचा अखेरचा टप्पा सुरू होणार असल्याने अनेक अडचणी कमी होणार आहेत. आर्थिक दृष्टीनेही आजचा दिवस चांगला आहे.

मीन

मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. बरेच दिवसापासून जाणवणारी मरगळ दूर होणार आहे. मात्र, धावपळ दगदग टाळणे गरजेचे आहे. व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. प्रत्येक गोष्टीत मतभेद व्यक्त करणे टाळावे. नशिबाची साथ मिळणार असल्याने रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्यास त्याचा फायदा होणार आहे. व्यवसायातील संकटांवर मार्ग सापडणार असल्याने तुमचा उत्साह वाढणार आहे. प्रथम स्थानात राहू असल्याने मनावरील दडपण दूर करत सकारात्मक विचार ठेवण्याची गरज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत खास राज्याभिषेक सोहळा; अशी झाली तयारी ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत खास राज्याभिषेक सोहळा; अशी झाली तयारी
अलौकीक सौंदर्याचे प्रतीक, अगाध शक्तीचे स्वरूप, अपरिमित वात्सल्याची मूर्ती, धर्मरक्षिण्या आसनस्थ होणार सिंहासनी 'आई तुळजाभवानी'. कलर्स मराठी वाहिनीवर आई राजा...
आधी झोपेच्या गोळ्या दिल्या नंतर शरीराचे 15 तुकडे केले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या
धक्कादायक! मूल होत नाही म्हणून पत्नीने घातला पतीच्या डोक्यात दगड
Weight Loss- वजन कमी करण्यासाठी आपल्या किचनमधील ‘हे’ गरम मसाले आहेत उपयुक्त! वाचा सविस्तर
उन्हाचा कडाका वाढला, पुरेशी काळजी घ्या! महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन
लाडक्या बहिणींचे पैसे वळविले कर्ज खात्यात, अजित नागरी पतसंस्थेच्या विरोधात ठिय्या आंदोलन; न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार
गेट वे हून जेएनपीएला चला 35 मिनिटांत; स्पीड बोटीची शुक्रवारी ट्रायल