औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर टाकून द्या; उदयनराजे भोसले कडाडले

औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर टाकून द्या; उदयनराजे भोसले कडाडले

औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्याचे वातावरण आणि सामाजिक सलोखा होरपळला आहे. नागपूरात महाल परिसरात विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढल्यानंतर सायंकाळी अचानक वातावरण कलुषित झाले होते. त्यानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपाचा राडा सुरु झाला आहे.यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज घराण्याने आपली भूमिका मांडली आहे. नागपूरात जे झाले त्याचं समर्थन कोणीच करु शकत नाही. दंगलखोरांना जातपात नसते , मी भाजपात आहे म्हणून हे बोलत नाहीत एक नागरिक म्हणून ही माझी मागणी आहे असे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली थेट भूमिका मांडताना सांगितले की….

खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्तिमत्व की ज्यांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला. लोकशाहीचा ढाचा रचण्याचे काम शिवाजी महाराज यांनी केले आहे. त्यामुळे त्यांची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि भाजपाने शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणण्याचे काम केले आहे एक व्यक्ती म्हणून मी हे सांगतो असेही ते म्हणाले.

 दंगल खोरांना जात पात नसते

नागपूरच्या दंगलीचं कोणीच समर्थन करू शकत नाही. दंगल खोरांना जात पात नसते. सर्वधर्म समभावाचे विचार देशाला पुढे घेवून जातात. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा शासन मान्य असणारा इतिहास प्रकाशित करावा म्हणजे वाद होणार नाहीत असेही उदयनराजे यांनी यावेळी सांगितले.

फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असं काही नाही. काँग्रेसची राजवट होती तेव्हा भरपूर दंगली व्हायच्या, त्याला मोठ्या प्रमाणात आळा घातला पाहिजेत असे उदयनराजे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. शिवाजी महाराज यांच्या सहकाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते. त्यात मुस्लिम समाजाचे लोक होते आणि ते जबाबदार पदावर होते. नितेश राणे यांनी भावनेच्या भरात असं विधान केला असावं. राजीनामा मागण्याची अलीकडे एक फॅशन झाली आहे असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

द्वेष पसरवण्याचे काम काँग्रेस पक्षाने जास्त केलं

द्वेष पसरवण्याचे काम काँग्रेस पक्षाने जास्त केलं आहे. द्वेष त्यांनी पेरला आहे. मी आज भाजप म्हणून उत्तर देत नाही. देशाचा एक नागरिक म्हणून मी उत्तर देत आहे. शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा घटक म्हणून मी बोलत आहे. समाज एकत्र ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. आमदार, खासदार सगळ्यांची ही जबाबदारी आहे. औरंग्याच्या काबरीचं उदात्तीकरण होता कामा नये… तो काही संत नव्हता. त्याने देशात मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती. त्यायी कबर काढली तर ती या देशाच्या बाहेर टाकून दिली पाहिजे असेही उदयनराजे यांनी त्वेषाने सांगितले.

फडणवीस यांची औरंगजेबशी तुलना

हे हास्यास्पद आहे. ज्याने अशी तुलना केली त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडल असेल. त्याच्या चेकअपची गरज आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल क्रूर हा शब्द वापरला आहे. क्रूर असते तर फडणवीस पुन्हा सत्तेत आलेच नसते. दंगल घडवून आणणारे कुठल्या पक्षाचे नसतात. पोलिसांना सहकार्य करण्याचं काम समाजाने करणे गरजेचं आहे अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुख्यमंत्री म्हणाले नागपूर दंगल पूर्वनियोजित; सोशल मीडियावर ‘चल दंगल समजून घेऊ’ कविता पुन्हा चर्चेत मुख्यमंत्री म्हणाले नागपूर दंगल पूर्वनियोजित; सोशल मीडियावर ‘चल दंगल समजून घेऊ’ कविता पुन्हा चर्चेत
नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या दंगलीवरून विरोधकांनी विधिमंडळात सरकारला धारेवर धरले. अखेर नागपूर दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. यावेळी...
Buldhana News – पाडकाम करताना घर अंगावर कोसळलं, बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू
गुहागरच्या खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात बोगस प्रवेश अन् करोडोंचा गैरव्यवहार, भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप
निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदान कार्ड ‘आधार’शी लिंक करण्याचा निर्णय
सरकारचे अपयश लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला औरंगजेबाची कबर आठवते का? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
…तेथे बांधकाम सुरु होते त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची धार वाढली, नागपूर पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम