अबू आझमींकडून औरंगजेबचे गुणगाननंतर मुलगा फरहानची गुंडगिरी समोर, थेट बंदूक काढत धमकवले
Samajwadi Party leader Abu Azmi: समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आमदार अबू आझमी यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले होते. त्यांनी औरंगजेबचे गुणगान केले होते. औरंगजेब क्रूर नव्हता. त्याने अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता, अशी मुक्तफळे अबू आझमी यांनी उधळली होती. त्याच्यावर चौफरे टीका झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. भाजप, शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली. त्यानंतर अबू आझमी यांनी आपले वक्तव्य मागे घेतले. आता अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांची गुंडगिरी समोर आली आहे. त्याने थेट बंदूक काढत धमकावले आहे.
अबू आझमीचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
अबू आझमी यांच्या मुलगा फरहान आझमी याने गोव्यात गुंडगिरी केली आहे. यू टर्न घेताना त्यांच्या गाडीला मागील गाडीचा धक्का लागला. त्यानंतर फरहान आझमी यांनी थेट बंदूक काढली. गाडी चालकांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यावरुन त्याच्यावर कलम १९४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गोवा पोलिसांनी फरहान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गोव्यातील कलंगुट बीचजवळ हा प्रकार झाला.
फरहान आझमी हा मर्सिडीज जी -वॅगन गाडीतून जात होता. त्यावेळी कांदोळी भागातून जात असताना त्याच्या कारने इंडिकेटर दाखवले नाही आणि वळण घेतले. यावरुन मोठा वाद झाल्यानंतर फरहान याने बंदूक काढली होती.
अबू आझमी विरोधात शिवसेनेकडून गुन्हा दाखल
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या तक्रारीवर ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अबू आझमी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय न्याय संहिता कलम २९९,३०२, ३५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे विधानसभेत अबू आझमी यांचे निलंबन करण्याची मागणी होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील याबाबत आक्रमक झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अबू आझमी यांचा वक्तव्याचा निषेध केला आहे. अबू आझमी देशद्रोही आहे, त्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List