देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच पक्षाचे लोक औरंगजेब ठरवत आहेत, हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा साधला निशाणा
“औरंगजेबचे शासन जितके क्रूर होते, त्यात क्रूर पद्धतीने आज महाराष्ट्र सरकारचा कारभार सुरु आहे. औरंगजेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची क्रूरता एकसारखी आहे. हे मी बोलल्यापासून भाजपची तंतरली आहे. मी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला नाही, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरला नाही तरीही भाजपाचे नेते माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत आहेत. औरंगजेब व फडणवीस यांच्या कारभाराची तुलना केली तर भाजपाचे नेते फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली, असा कांगावा करत देवेंद्र फडणवीस यांनाच औरंगजेब ठरवत आहेत”, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.
हर्षवर्धन सपकाळ म्हणले की, “देशमुखांची निघृण हत्या, स्वारगेट बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिला अत्याचाराचे प्रकार पाहता राज्यातील फडणवीस सरकारचा कारभार हा औरंगजेबाच्या कारभारासारखाच आहे या विधानातून दोन शासकांच्या कारभाराची तुलना केलेली आहे, व्यक्तींची नाही, असे असतानाही भाजापाचे काही नेतेच फडणवीस यांची तुलना क्ररकर्मा औरंगजेबाशी करत आहेत.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List