सरकारने पुन्हा एकदा नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी करावी; अंबादास दानवे यांची मागणी
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन चांगलेच गाजत आहे. राज्यात सोयबीन, कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न बिकटच झाला आहे. सोयाबिनचे दर घसरत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. तसेच सरकारने पुन्हा एकदा नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी करावी, अशी माहणीही दानवे यांनी केली आहे.
राज्य सरकारने नाफेडमार्फत 55 ते 60% सोयाबीन खरेदी केलेली आहे. 40% सोयाबीन खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षाही कमी दरात सोयाबीन विकावे लागत आहे. हमीभावापेक्षाही कमी दरात कोणी खरेदी केली तर त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री वारंवार सांगतात. मात्र आजवर हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्या कोणत्याही व्यापाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. सरकारने पुन्हा एकदा नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी व्हावी, ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजे,अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List