World Sleep Day: चांगली झोप हवी असेल तर हे काम कराच, आजारी लोकांना देखील मिळेल आराम

World Sleep Day: चांगली झोप हवी असेल तर हे काम कराच, आजारी लोकांना देखील मिळेल आराम

१४ मार्च रोजी दरवर्षी World Sleep Day साजरा केला जातो. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात लोक चांगल्या झोपेसाठी अक्षरश: तळमळत असतात. कारण महागडे गाद्यागिरद्या आणि एसी लावूनही अनेकांना नीट झोप येत नाही. त्यामुळे दुसरा दिवस सगळा आळसावल्या सारखा जातो. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी नेमके काय करावे यावर अनेक पातळीवर संशोधन सुरु आहेत.

होळीच्या दिवशीच आज १४ मार्च हा दिवस जगभरात World Sleep Day म्हणून साजरा केला जातो. अनेकांना आता मेहनतीची कामे कमी झाल्याने रात्रीची झोप लागत नाही. अनेकजण या निद्रानाशाच्या आजाराने त्रस्त आहेत. अनेकांना तर थोड्याशा आवाजाने देखील जाग येत असते. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी लोक मोठा महागडा बेड आणतात. अनेकजण कुलर आणि एसी खर्च करुन लावतात. परंतू महागड्या गाद्या आणि पलंग तसेच महागडे एसी लावूनही अनेकांना रात्रीची नीट धड झोप लागत नाही. त्यामुळे आज World Sleep Day निमित्त आपण चांगल्या झोपेसाठी काही करता येईल का ते पाहूयात…

तुम्हाला माहीती आहे का ? आपल्या घरातील गाद्या, चादरी आणि उशांमध्ये अनेक बॅक्टेरियांची उपस्थिती असते. एका आठवड्यात आपल्या उशीमध्ये ३० लाखापर्यंत बॅक्टेरिया असू शकतात. ही संख्या टॉयलेट सीटहून १७ हजार पट जास्त आहे. एवढेच नाही तर चादरीवर देखील हजारो बॅक्टेरिया असतात. अनेक जण या बॅक्टेरिया सोबत रात्रभर झोपतात.

या बॅक्टेरियामुळे तुम्ही आजारी पडू शकता. किंवा तुम्हाला अलर्जी वाढू शकते. Dyson’s Global Connected Indoor Air Quality Data Research च्या मते सायंकाळी 6 ते रात्री उशीरापर्यंत एअर पॉल्युशन उच्च पातळीवर असते. याचे प्रमाण PM 2.5 पर्यंत असू शकते.

वर्ल्ड स्लीप डे निमित्ताने काय करावे?

घर तसेच बेडरुममध्ये हवेतील प्रदुषण दूर करण्यासाठी आणि अलर्जीला हटविण्यासाठी एखादा चांगला एअर प्युरीफायर खरेदी करु शकता. एअर प्युरीफायर खरेदी करण्यापूर्वी तो तुमच्या गरजेनुरुप आहे याची आधी खातरजमा करा. यात एफीसिएंट सेंसर आणि फिल्टर्स असायला हवेत. जे पॉल्युशन आणि अलर्जी पार्टीकल्सना दूर ठेवू शकतील. चांगल्या  क्वालीटीचा एअर प्युरीफायर 99.95 परसेंट पार्टिकल्सला क्लीन करु शकतो. मग तो 0.1 microns असला तरीही उपयोगी आहे. या अदृश्य स्वरुपातील डोळ्यांना सहज न दिसणारे डस्ट, पॉलेन, एलर्जेन्स आणि बॅक्टीरिया पार्टिकल्सना हटवू शकतो. जर कोणाला धुळीच एलर्जी आहे. किंवा अस्थमा आहे किंवा पॉल्युशन पार्टिकल्सपासून अलर्जी आहे.त्यांच्यासाठी एअर प्युरीफायर अलर्जी आणि डस्ट पार्टीकल्सला कमी करु शकतो.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रश्मिका मंदानाने हवाच केली, ‘या’ लक्झरी कारमध्ये विमानतळावर दिसली, किंमत ऐकाल तर शॉक व्हाल रश्मिका मंदानाने हवाच केली, ‘या’ लक्झरी कारमध्ये विमानतळावर दिसली, किंमत ऐकाल तर शॉक व्हाल
Rashmika Mandanna New Mercedes Benz S450: काही महिन्यांत पुष्पा 2 आणि छावा सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये अल्लू अर्जुन आणि विकी कौशल...
Santosh Deshmukh Case – आरोपींनी फाशी होत नाही, तोपर्यंत एकही सण साजरा करणार नाही; मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्धार
बदलापूरमध्ये होळी खेळण्यासाठी गेलेले चार तरुण उल्हास नदीत बुडाले, परिसरात हळहळ
मोठी बातमी! बदलापूरमध्ये उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू
‘राज ठाकरे भांग पिऊन बोलतात’; भाजप नेत्यानं उधळले रंग
World Sleep Day: चांगली झोप हवी असेल तर हे काम कराच, आजारी लोकांना देखील मिळेल आराम
Another Round… Another Round! मद्यधुंद तरुणाने अनेकांना उडवलं, एका महिलेचा मृत्यू