रशिया युद्धविरामासाठी तयार, पण पुतीन यांनी ठेवल्या 4 अटी; युक्रेन झुकणार की महासत्ता अमेरिका एक पाऊल मागे घेणार?
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षापासून युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये आजतागायत शेकडो जवानांसह सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. तसेच वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू असून अमेरिकेची सूत्र दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यात जातीने लक्ष घातले आहे. नुकतीच सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये अमेरिकने 30 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव सादर केला आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदीमीर झेलेन्स्की यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर आता रशियानेही यावर सहमती दर्शवली आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी काही अटी ठेवल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List