Video: भाषा नाही तर भावना सर्व काही सांगून जातात, दक्षिण भारतातही ‘छावा’ची क्रेझ
गेल्या काही दिवसांपासून ‘छावा’ हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमामध्ये अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाजारांची भूमिका साकरली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यानंतर ७ मार्चला हा सिनेमा दक्षिण भारतात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला तेथही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
‘छावा’ सिनेमामध्ये अनेक मराठी कलाकरांनी देखील भूमिका साकरली आहे. त्यामध्ये अभिनेता संतोष जुवेकर हा रायाजी या भूमिकेत दिसत आहे. संतोषने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दक्षिण भारतात ‘छावा’ सिनेमाला मिळत असलेल्या प्रतिसादाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक चित्रपटगृहामधून बाहेर येऊन सिनेमा कसा वाटला याविषय प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. संतोषने हा व्हिडीओ शेअर करत, “७ मार्च ला तेलगू भाषेत छावा प्रदर्शित झाला. तिकडच्या प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया इथे तुम्हां सोबत share करतोय. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ” असे कॅप्शन दिले आहे.
सोशल मीडियावर संतोषने शेअर केलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने ‘सगळ्या भाषेत सिनेमा डब केला पाहिजे’ अशी कमेंट केली आहे. तसेच अनेकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. सध्या संपूर्ण जगभरात ‘छावा’ सिनेमाची वाह वाह होताना दिसत आहे.
वाचा: रोल किती आणि बोलतो किती; अक्षय खन्नाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे संतोष जुवेकर ट्रोल
‘छावा’ सिनेमाविषयी
‘छावा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल दिसत आहे. येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत. त्यामध्ये संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List