या सुपरस्टारच्या प्रेमात वेडी झाली होती तब्बू, 10 वर्षे वाट पाहिली, 53 व्या वर्षीही एकटी
बॉलिवूडमध्ये 90 मधील पण अशा काही लव्हस्टोरीच आहेत ज्यांची चर्चा अगदी आजही होते. त्यातील बॉलिवूड जोडी जिच्या प्रेमाचे किस्से आजही चर्चेत असतात. या जोडीतील अभिनेत्री तर आजही सिंगल. ही अभिनेत्री म्हणजे सर्वात प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तब्बू. ती तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे, मात्र तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलंय. 53 वर्षांची तब्बू अजूनही अविवाहित आहे आणि तिने लग्नही केलेलं नाही. तुम्हाला माहिती आहे का की एक काळ असा होता जेव्हा तब्बू 10 वर्ष कोणाची तरी वाट पाहत होती? पण या वाट पाहण्याचा काही परिणाम झाला नाही आणि नंतर तिने प्रेमापासून स्वतःला दूर केलं. तब्बूने तिच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वर्ष ज्याच्यासाठी घालवली ती व्यक्ती कोण आहे माहितेय.
अजय आणि तब्बूच्या रोमँटिक लिंकअपच्या बातम्या?
तब्बूचे नाव अनेक बॉलिवूड कलाकारांशी जोडलं गेलं होतं, परंतु ती कधीही तिच्या लव्ह लाइफबद्दल उघडपणे बोलली नाही. रिपोर्ट्सनुसार, तिचे पहिले अफेअर संजय कपूरसोबत होते असं म्हटलं जातं. यानंतर, चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्याशी तिच्या जवळीकतेच्या बातम्या आल्या होत्या. त्याच वेळी, अजय देवगण आणि तब्बू यांच्यातील मैत्री देखील घट्ट होती, ज्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरत राहिल्या. तथापि, अजय आणि तब्बू यांनी नेहमीच त्यांचे नाते मैत्रीचे असल्याचं सांगितलं आहे आणि अशा रोमँटिक लिंकअपच्या बातम्यांना नकारच दिलाय.
जेव्हा तब्बूने 10 वर्षे या अभिनेत्याची वाट पाहिली
पण तब्बूच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती होती ज्याची तिने 10 वर्ष वाट पाहिली, पण तरीही त्यांचे नाते लग्नाच्या टप्प्यावर पोहोचू शकले नाही. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून साऊथ सुपरस्टार नागार्जुन होती. नागार्जुन आणि तब्बू अनेक चित्रपटांदरम्यान भेटले आणि हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आले. त्यांचे नाते जवळजवळ 10 वर्षे टिकलं . तब्बूला नागार्जुनसोबत लग्न करायचे होते. मात्रनागार्जुन विवाहित असल्याने त्यांच्या नात्याचे भविष्य पुढे काय याबद्दल तिला चिंता होती. जेव्हा तिला त्यांच्या नात्याबद्दल असुरक्षितता वाटू लागली तेव्हा तब्बूने तिला त्यांच्या या नात्यापासून दूर केलं.
तब्बू आणि नागार्जुनच्या अफेअरच्या बातम्या पसरत होत्या
तब्बू आणि नागार्जुनच्या अफेअरच्या बातम्या पसरत होत्या, तेव्हा नागार्जुन आधीच विवाहित होता आणि त्याची पत्नी अमलासोबतचे त्याचे नाते घट्ट होते. त्याने कधीही तब्बूशी खोटे बोलले नाही आणि तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. तब्बूने हे नाते बराच काळ टिकवून ठेवले, पण अखेर तिला जाणवले की या प्रेमाला भविष्य नाही.
तब्बूने प्रेमापासून स्वतःला दूर केलं
नागार्जुनपासून वेगळे झाल्यानंतर तब्बूने कधीही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलले नाही. त्यानंतर तिने कोणाशीही संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला आणि आजही ती एकटीच आयुष्य जगत आहे. वयाच्या 53 व्या वर्षीही तब्बूने लग्न केलेलं नाही. पण ती तिच्या करिअर आणि आयुष्याबद्दल पूर्णपणे समाधानी दिसते. तिच्या या अपूर्ण प्रेमकथेनं अनेकांची मने तोडली, पण तब्बूने ती आपली ताकद बनवली आणि पुढे गेली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List