मेगास्टार मेहश बाबूचे स्टार अभिनेत्रीशी अफेअर, गुपचूप मुंबईत भेटताना पत्नीने रंगेहाथ पकडलं?
कलाकार म्हटले की त्यांच्या चित्रपटांसोबतच कायम खासगी आयुष्याच्या चर्चा रंगतात. अनेकदा कलाकारांचे लव्हअफेअर सर्वांसमोर येतात. तर कधी कधी या सर्व अफवा असतात. नुकताच दाक्षिणात्य मेगास्टार महेश बाबूच्या खासगी आयुष्याबाबात मोठी माहिती समोर आली आहे. याविषयी एका निर्मात्याने वक्तव्य केले आहे. त्याने ‘महेश बाबूचे स्टार अभिनेत्रीसोबत अफेअर होते’ असा खळबळजनक खुलासा केला आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…
नुकताच निर्मात्या गीता कृष्णा यांनी एका मुलाखतीमध्ये महेश बाबूच्या गुप्त अफेअरवर टिप्पणी केली आहे. त्याचे अभिनेत्री त्रिशासोबत अफेअर होते. तसेच हे प्रेमसंबंध गुप्त होते असा देखील खुलासा गीता कृष्णा यांनी केला. ‘महेश बाबू आणि त्रिशा मुंबईमध्ये गुप्तपणे भेटत असत. एकेदिवशी महेश बाबूची पत्नी नम्रताला या प्रकरणाचा छडा लागला. त्यानंतर नम्रताने हुशारीने हा प्रश्न सोडवला’, असे गीता कृष्ण म्हणाल्या. “आगीशिवाय धूर येत नाही” असे आपण अनेकदा ऐकतो. म्हणून, त्यात काही सत्य असले पाहिजे, असे निर्मात्याचे मत आहे. यामुळे महेश-तृषाचे अफेअर पुन्हा चर्चेत आले आहे.
महेश बाबूच्या लग्नाविषयी
महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांचा प्रेमविवाह झाला आहे. दोघांची पहिली भेट ही ‘वंशी’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर ते अनेकवर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्यांच्या रिलेशनशीपविषयी कोणालाही माहिती नव्हती. त्यांनी कटुंबीयांच्या संमतीने लग्न केले होते. त्यांचे लग्न सर्वांना चकीत करणारे होते. त्यांच्या लग्नाला अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. आता लग्नाच्या इतक्या वर्षानंतर महेश बाबू विषयी निर्मात्या गीता कृष्णा यांनी केलेल्या खळबळजनक टिप्पणीने सर्वांचे लक्ष वेधले.
महेश बाबूच्या आगामी सिनेमांविषयी
महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमधील एक आहे. लवकरच तो दिग्दर्शक एसएस राजमौली यांच्या SSMB 29 या चित्रपटात दिसणार आहे. हा एक पॅन इंडिया सिनेमा आहे. या चित्रपटाची कथा राजामौली यांचे वडील विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. या चित्रपटात महेश बाबूसोबत बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील दिसणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List