‘मी जिवंत आहे…’, गोविंदाचे सेक्रेटरी शशी सिन्हा यांच्या मृत्यूची बातमी खोटी, अंत्यसंस्काराचा VIDEO व्हायरल
Govinda: बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदाचे माजी सेक्रेटरी शशी प्रभू यांचं 6 मार्च रोजी निधन झालं. शशी प्रभू दीर्घकाळापासून हृदयविकाराने त्रस्त होते आणि नुकतीच त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया देखील झाली होती. गोविंदाल शशी प्रभू यांच्या निधनाची बातमी समजताच तो त्याच्या कुटुंबीयांना भेटायला आला. रात्री 10 वाजता त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गोविंदा रडताना आणि अश्रू पुसताना दिसत आहे.
सांगायचं झालं तर, शशी प्रभू यांनी अनेक वर्ष गोविंदासोबत काम केलं. सेक्रेटरीसोबतच शशी प्रभू हे गोविंदाचे चांगले मित्र देखील होते. शशी प्रभू यंनी संकटकाळी कधीत अभिनेत्याची साथ सोडली नाही. त्यामुळे शशी प्रभू यांच्या निधनाची बातमी कळताच गोविंदा त्यांच्या घरी पोहोचला. सध्या सोशल मीडियावर गोविंदाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता ढसा-ढसा रडताना दिसत आहे.
सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये देखील गोविंदाच्या व्हिडीओची चर्चा सुरु आहे. पण याठिकाणी मोठी गडबड झाली आहे. गोविंदाचे माजी सेक्रेटरी शशी प्रभू यांचं निधन झालं आहे. पण अनेकांना गोविंदाच्या सध्याचे सेक्रेटरी शशी सिन्हा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, शशी सिन्हा यांनी त्यांच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. सांगायचं झालं तर, दोघांचे नाव सारखेच असल्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. गोविंदाच्या सध्याच्या सेक्रटरीचं नाव देखील शशी आहे, परंतु त्यांचं आडनाव सिन्हा आहे, ज्यामुळे लोक गोंधळले. अनेकांनी त्यांना श्रद्धांजलीचे पाठवले. या अफवेवर शशी सिन्हा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शशी सिन्हा म्हणले अफवा पसल्यानंतर त्यांना सतत फोन आणि मेसेज येवू लागले. शशी सिन्हा म्हणाले, ‘लोकांना कळायला हवं की नावात समानता असल्यामुळे गोंधळ उडाला आहे. शशी प्रभू गोविंदाने जुने मित्र आणि सचिव होते. मीनंतर त्यांच्या टीममध्ये दाखल झालो…’ त्यांनी अफवा पसरवू नका असं देखील सांगितलं आहे. गोविंदा आणि शशी प्रभू हे लहानपणापासूनचे मित्र असल्याचेही त्यांनी सांगितलं. गोविंदाच्या संघर्षाच्या काळात शशी प्रभूंनी त्याला खूप साथ दिली.
शशी सिन्हा पुढे म्हणाले, ‘शशी प्रभू हे त्यांचे जवळचे मित्रच नव्हते तर भावासारखे होते. गोविंदा आजही त्यांची आठवण तितक्याच आदराने आणि प्रेमाने करतो. शशी प्रभू यांनी गोविंदाच्या कारकिर्दीत मोठी भूमिका बजावली आणि त्यांना राजकारणात येण्यास मदत केली.’
शशी सिन्हा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, शशी सिन्हा गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदाचे सेक्रेटरी आहेत आणि त्यांच्या इतर बॉलीवूड स्टार्सचे कामही सांभाळतात. आमिर खान, आयेशा झुल्का आणि संगीता बिजलानी यांसारख्या अनेक कलाकारांचे ते मॅनेजर आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List