‘हा शो बंद झाला तर मी…’ अमिताभ बच्चन केबीसीच्या मंचावर भावूक अन् डोळ्यात अश्रू
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय होतात. तसेच त्यांनी केलेले ट्वीट असो किंवा एखादी पोस्ट असो. त्यात सर्वात सक्रिय असणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. बिग बी हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते त्यांच्या वर्कबद्दल असो किंवा त्यांच्या आयुष्यातील काही घडामोडी असो. काहीना काही ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतच असतात. मध्यंतरी त्यांचे एक ट्वीट प्रंचड व्हायरल झालं होतं. ” जाण्याची वेळ आली आहे”. यांच्या या ट्वीटची चर्चा फारच झाली होती. या ट्वीटमुळे चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती.
केबीसीच्या मंचावरील भाविनक किस्सा
अभिनेते अमिताभ बच्चन यांचे करोडोंनी चाहते आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली किंवा कधी कोणत्या कार्यक्रमात ते भावूक होताना दिसले की, लगेचच चाहतेही थोडे भावनिक होतात. असाच एक किस्सा घडला केबीसच्या सेटवर . अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे मेगास्टार असून ते वयाच्या 82 व्या वर्षीही इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत आणि काम करत आहेत. अमिताभ सध्या ‘केबीसी 16’च्या सीझनचं सूत्रसंचालन करत आहेत. आता अमिताभ यांनी ‘कौन बनेगा करोडपती 16’ च्या मंचावर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
‘त्या दिवशी मी सुद्धा बंद होईन…’
अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांकडे पाहिलं आणि म्हणाले की, ‘तुम्हीच आहात ज्यामुळे मला ऊर्जा मिळते.’ अमिताभ यांनी हे वाक्य उच्चारतात सर्वांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या. पुढे अमिताभ बच्चन भावुक होऊन म्हणाले की, ‘ज्या दिवशी हा शो बंद होईल त्याच दिवशी मी सुद्धा बंद होईन’ अमिताभ यांचं वक्तव्य ऐकून सगळेच थक्क झाले. सर्वांचंच त्यांच्या या वक्तव्यामुळे मन हेलावलं. सर्व प्रेक्षकांनी त्यांना असं न बोलण्याची विनंती केली.
“भावूकतेनं त्यांच्या डोळ्यात पाणी”
पुढे अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘मी अत्यंत योग्य बोलतोय. शेवटी मी एक कलाकार आहे आणि त्यामुळे माझ्यातल्या कलाकाराला अशाच गोष्टी जिवंत ठेवतात. तुम्ही मोठ्या पडद्यावर मला बघता. मी जे काही करेल ते तुम्हाला प्रचंड आवडतं. तुम्ही त्या गोष्टीचं कौतुक करता. जोरजोरात टाळ्या वाजवता. तुमच्या टाळ्या माझ्यासाठी जेवणासारख्याच आहे.’ असं म्हणत त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच त्या व्यक्त करत असताना ते थोडे भावनिक झाले होते. तसेच भावूकतेनं त्यांच्या डोळ्यात पाणी आलेले पाहायला मिळाले.
‘रामायण’मध्ये लवकरच दिसणार
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती 16’ होस्ट करत आहेत. ते 2024 मध्ये रजनीकांत स्टारर ‘वेट्टियां’ चित्रपटात दिसले होते. सध्या त्यांनी कोणत्याही नवीन चित्रपटाची घोषणा केलेली नाही, परंतु असं म्हटलं जात आहे की, ते नितेश तिवारीच्या ‘रामायण’ मध्ये दिसणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List