बापरे! पायऱ्यांवरून पाय घसरुन पडली कंगना, Oops Momentची शिकार होता होता वाचली

बापरे! पायऱ्यांवरून पाय घसरुन पडली कंगना, Oops Momentची शिकार होता होता वाचली

बॉलिवूड अभिनेत्री या त्यांच्या लाइफस्टाइलसाठी विशेष ओळखल्या जातात. त्यांचे कपडे, चपला, पर्स, घड्याळे या सर्वच गोष्टी नेहमी चाहत्यांना आकर्षित करतात. पण कधीकधी अभिनेत्रींना त्यांनी घातलेल्या कपड्यांमुळे किंवा चपलांमुळे त्रास होतो.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक अभिनेत्री पायऱ्यांवरून घसरून पडली आहे. तिचा हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

अभिनेत्री, मॉडेल कंगना शर्मा नुकतीच मुंबईतील एका हॉटेलमधून बाहेर आली. तिने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने उंच हिल्सचे सँडल घातले होते. कंगना हॉटेल बाहेर फोटोग्राफर्सला पोज देत असते. त्यानंतर थोडं पुढे येऊन पुन्हा पोझ देत. कंगानाचे पुढे असलेल्या पाऱ्यांकडे लक्ष नसते. त्यात तिने उचं हिल्स घातल्यामुळे तिचा तोल जातो आणि ती पाय पायऱ्यांवरून घसरतो. अभिनेत्री पुन्हा उभी राहाते आणि फोटोग्राफरला पोज देते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिकिया

कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. कंगनाचा ड्रेस हा मोनिकिनीसारखा असल्यामुळे ती Oops Momentची शिकार झालेली नाही असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘बापरे खूपच जोरात पडली’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘मोये मोये’ असे म्हटले आहे.

कंगनाच्या कामाविषयी

कंगना ही कायमच तिच्या बोल्ड फॅशमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील सर्वांचे लक्ष वेधते. तिने ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने, ‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘तू सूरज मैं सांझ पियाजी’ सारख्या कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. आता कंगनाचा पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य
राज्यात एआयमुळे (AI) मुळे बेरोजगारी वाढू शकते, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत व्यक्त...
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग