1-2 नव्हे प्रियांकाने विकले तब्बल 4 फ्लॅट्स, देसी गर्लला किती कोटींचा फायदा?
हिंदी चित्रपटसृष्टीतील, बॉलिवूडमधील ‘देसी गर्ल’ अर्थात प्रियांका चोप्रा हिची गणना इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या आणि श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते. चित्रपटांव्यतिरिक्त, प्रियांका ही ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणूकीतूनही चांगली कमाई होते. या अभिनेत्रीने आता अमेरिकेत बसून भारतात करोडो रुपयांची डील केली आहे. प्रियांका चोप्राने मुंबईतील तिचे 1 -2 नव्हे तब्बल 4-4 फ्लॅट्स विकून कोट्यवधींची कमाई केली आहे.
एका रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्राने मुंबईतील तिचे चार अपार्टमेंट एका कुटुंबाला विकले आहेत. यातून अभिनेत्रीला 16 कोटींपेक्षा जास्त नफा झाला आहे. हा व्यवहार 3 मार्च 2025 रोजी झाला. सचदेवा कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांनी ही मालमत्ता खरेदी केली आहे.
किती कोटींमध्ये झाली डील ?
रिपोर्टनुसार, प्रियंका चोप्राने तिचे सर्व फ्लॅट्स 16.17 कोटी रुपयांना विकले आहे. हे चार फ्लॅट मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या ओबेरॉय स्काय गार्डनमध्ये आहेत. यातील तीन फ्लॅट 18 व्या मजल्यावर आहेत तर एक फ्लॅट 19 व्या मजल्यावर आहे. फ्लॅट क्रमांक 1801/A श्रुती गौरव सचदेवा यांनी 3 कोटी 45 लाख 11 हजार 500 रुपयांना खरेदी केला होता. 1,075 चौरस फुटांच्या या फ्लॅटसाठी 17 लाख 26 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले.
तर फ्लॅट क्रमांक 1801/C स्नेहा डांग सचदेवाने 2 कोटी 85 लाख रुपयांना खरेदी केला होता. 885 चौरस फुटांच्या या फ्लॅटसाठी 14 लाख 25 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले. फ्लॅट क्रमांक 1901/C रौनक त्रिलोका सचदेवा यांना 3 कोटी 52 लाख रुपयांना विकण्यात आला. या 1 हजार 100 चौरस फुटांच्या फ्लॅटसाठी 21 लाख 12 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले. फ्लॅट्सच्या जोडीचा (1801/B आणि 1901/B) सौदा 6 कोटी 35 लाख रुपयांना झाला होता. तो रजनी त्रिलोक सचदेवा यांनी खरेदी केली असून 31 लाख 75 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.
देसी गर्ल अमेरिकेत स्थायिक
प्रियांका चोप्राने 2018 साली अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केले. लग्नानंतर प्रियंका भारत सोडून अमेरिकेत कायमची शिफ्ट झाली. ती पती निक आणि मुलगी मालतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. पण ती वेळोवेळी भारताला भेट देत असते. नुकतीच प्रियांका ही तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी भारतात आली होती. तिच्या कामाबद्दल बोलायचे झालं तर, तिने 2019 च्या ‘स्काय इज द पिंक’ चित्रपटात बॉलिवूडमध्ये शेवटचं काम केले होते. तिच्या आगामी प्रकल्पांमध्ये ‘द ब्लफ’ आणि ‘हेड ऑफ स्टेट’ यांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List