Chhaava: ‘या’ कारणामुळे ‘छावा’ सिनेमाला मोठा धक्का बसण्याची शक्यता, रिपोर्ट अखेर समोर

Chhaava: ‘या’ कारणामुळे ‘छावा’ सिनेमाला मोठा धक्का बसण्याची शक्यता,  रिपोर्ट अखेर समोर

Chhaava Box Office Collection Day 21: अभिनेता विकी कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमाला प्रदर्शित होऊन आज तीन आठवडे झाले आहेत. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमा आजही मोठ्या पडद्यावर चाहत्यांचं मनोरंजन करतना दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून 20 कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या ‘छावा’ सिनेमाची कमाई घट झाल्याचं चित्र दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सिनेमाच्या कमाईचा आकडा मंदावला आहे. त्यामुळे ‘छावा’ सिनेमा ‘गदर 2’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकतो का? पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या 21 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ सिनेमाचं राज्य आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, 21 व्या दिवशी सिनेमाने जवळपास 5.35 कोटींचा गल्ला जमा केला आहे. ‘छावा’ सिनेमाने आतापर्यंत 483.40 कोटींचा गल्ला जमा केला आहे. आता सिनेमा 500 कोटींचा आकडा पार करण्यात यशस्वी होतो की नाही, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘छावा’ सिनेमाच्या पहिल्या आठवड्याची कमाई – निर्मात्यांनी जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्याच दिवशी सिनेमाने 33.1 कोटींची कमाई केली. त्यानंतर सिनेमाच्या कमाईचा ग्राफ वाढतच राहिला. सिनेमाने पहिल्या आठवड्यात 225.28 कोटींचा गल्ला जमा केला.

‘छावा’ सिनेमाच्या दुसऱ्या आठवड्याची कमाई – दुसऱ्या आठवड्यात देखील सिनेमाने बॉक्स ऑफिस बक्कळ कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने 186 कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्याची कमाई 411.46 इतकी आहे.

‘छावा’ सिनेमाच्या तिसऱ्या आठवड्याची कमाई – तिसऱ्या आठवड्यात सिनेमाच्या कमाईचा आकडा मंदावताना दिसला. तिसऱ्या दिवशी सिनेमाने 79.43 कोटींची कमाई केली.

‘छावा’ सिनेमाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने 20 दिवसांमध्ये 490.89 कोटींचा गल्ला जमा केलाय. तर 21 दिवसाच्या कमाईचे आकडे मिळवल्यास सिनेमाची कमाई 496.24 कोटीं झाली आहे. सिनेमा लवकरत 500 कोटींच्या घरात एन्ट्री करेल. पण सिनेमा ‘गदर 2’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करू शकेल नाही.. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिनेता सनी देओल स्टारर ‘गदर’ सिनेमा 21 दिवसांमध्ये 525.7 कोटींची कमाई केली होती.

‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित सिनेमाचं बजेट 130 कोटी होतं आणि सिनेमाने या रकमेच्या 4 पट अधिक कमाई केली आहे. सिनेमात अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. तर संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

औरंगजेबाने जेवढे लोक मारले, तेवढेच लोक राज्य सरकारच्या… बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया काय? औरंगजेबाने जेवढे लोक मारले, तेवढेच लोक राज्य सरकारच्या… बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया काय?
तत्कालीन शिंदे सरकारसोबत असलेले प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका...
‘उद्धव ठाकरेंनीच माझ्यासाठी निरोप पाठवला होता, नार्वेकर…’, चित्रा वाघ यांचा मोठा गौप्यस्फोट
Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये’; एकनाथ शिंदेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी बातमी
‘त्यांनी मला जवळ घेतलं अन्…’ अभिनेत्रीने सांगितला संतोष जुवेकरसह काम करण्याचा अनुभव
झोपण्यापूर्वी मखाना दूध प्यायल्यास काय होते? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
Video – मुंबईकरांच्या हक्कासाठी सुनील प्रभू यांनी विधिमंडळात उठवला आवाज
कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षणावरून गोंधळ, भाजपच्या 18 आमदारांचं 6 महिन्यांसाठी निलंबन; नेमकं काय घडलं?