‘प्रेम संपतं असं…” विजय वर्मासोबत ब्रेकअपच्या चर्चांनंतर तमन्ना भाटीया पहिल्यांदाच थेट बोलली
Tamanna Bhatia And Vijay Varma Break Up: तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या ब्रेकअपची गेल्या दोन-तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दोघांनीही 2022 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. चाहत्यांना दोघांमधील सुंदर केमिस्ट्री देखील आवडली. नातं उघड केल्यानंतर दोघेही कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे. ही लोकप्रिय जोडी लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात होतं.
प्रेमाबद्दल तमन्ना भाटीयाचं महत्त्वाचं विधान
पण मग दोघांमध्ये असं काय झालं की, त्यांनी नाते संपवण्याचा निर्णय घेतला? त्यांच्या ब्रेकअपची बातमी आल्यापासून लोकांच्या मनात हाच प्रश्न घोळत आहे. दरम्याव यावर दोघांनी तेव्हा प्रतिक्रिया दिली नव्हती. पण ब्रेकअपच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच अभिनेत्री तमन्ना भाटीयाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. तमन्ना भाटीयाने प्रेमाबद्दल काही महत्त्वाची विधानं केली आहेत.
“त्याच क्षणाला प्रेम संपतं…”
तमन्ना आणि विजय वर्मा यांचे ब्रेकअप झाल्याची फक्त चर्चा आहे. या दोघांनीही आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या दोघांनीही आपापल्या समाजमाध्यम खात्यावरील एकमेकांचे फोटो डिलीट केल्याचं सांगितलं जातंय. असे असताना तमान्ना भाटीयाने एका मुलाखतीत प्रेमाविषयी तिचं मतं मांडलं आहे. ती म्हणाली की, “मला प्रेमाबद्दल नुकत्याच काही नव्या गोष्टी समजल्या. लोक प्रेम आणि नातं यात गफलत करतात. हे फक्त स्त्री आणि पुरुष यांच्या नात्यासोबतच होत नाही. ते मित्रांमध्येही घडतं. जेव्हा प्रेमात अटी आणि नियम येतात त्याच क्षणाला प्रेम संपतं असं मला वाटतं. प्रेमात कोणत्याही अटी आणि नियम नसावेत असं मला वाटत,”अशी प्रतिक्रिया तमन्ना भाटीया यांनी दिली आहे.
“त्या व्यक्तीला बंधनातून मुक्त केल पाहिजे”
तसेच पुढे ती म्हणाली की, “दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकमेकांवर प्रेम करत असतात. पण प्रेम हे एकतर्फी करायची गोष्ट आहे. तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीला बंधनातून मुक्त केल पाहिजे. तुम्ही तुमचे विचार त्या व्यक्तीवर थोपवून प्रेम करू शकत नाही. संबंधित व्यक्ती सध्या जशी आहे, त्यामुळेच तर तुम्ही प्रेमात पडता,” असंही मत तमन्ना भाटीयाने व्यक्त केलं आहे.
चाहत्यांची मोठी नाराजी
दरम्यान, तमन्ना आणि विजय वर्मा हे लस्ट स्टोरी वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनच्या शूटिंगदरम्यान एकमेकांजवळ आले. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. हीच मैत्री नंतर प्रेमात बदलली. एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी आपलं नातं जाहीर केलं आहे. रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर हे दोघे अनेकदा एकत्रही दिसले. विमानतळ, वेगवेगळ्या कार्यक्रमांत सोबत स्पॉटही झाले. आता मात्र ते वेगळे झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांची मोठी नाराजी झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List