मुंबईत 12 वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्कार, संतापलेला अभिनेता म्हणातो, ‘कायद्याचा धाक राहिलेला नाही…’
पुण्यातील स्वारगेट बस स्टँड बलात्कार प्रकरण ताजं असताना मुंबईत 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीतिच्या नातेवाईकांसोबत मुंबईतील जोगेश्वरी भागात राहत होती. घरात भांडण झाल्यामुळे घर सोडून निघालेली मुलगी घरी परतली नसल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्या 12 वर्षीय मुली पाच जणांनी आळीपळीने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्यानंतर संपूर्ण मुंबई हादरली आहे. घडलेल्या घटनेवर मराठी अभिनेत्याने देखील संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने कोणालाच कायद्याचा धाक राहिलेल्या नाही… असं म्हटलं आहे.
अभिनेता अक्षय केळकर हीच बातमी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत म्हणाला, “आता हे अती झालं. कायद्याचा धाक राहिला नाही कोणालाच…मेट्रो सिटीमध्ये ही परिस्थिती तर बाहेर अशा बऱ्याच गोष्टी असतील…#भीषण…” सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. 12 वर्षीय मुलीवर झालेल्या घटनेनंतर महिलांसाठी सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबई शहरातही महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबई आता खरंच महिलांसाठी सेफ आहे का? असा प्रश्न सतत उपस्थित होत आहे.
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, एका एसी मॅकेनिकने मुलीचं अपहण केलं. मुलीला एकटी पाहून आरोपींनी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागात असलेल्या त्याच्या घरी नेले. जिथे तीन जणांनी मुलीवर आळीपाळीने अत्याचार केले. त्यानंतर दोघांनी मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर दादर स्थानकावर मुलली पोलिसांना सापडली. याप्रकरणी पोलिसांनी पाचही अरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
यापूर्वी 3 फेब्रुवारी रोजी वांद्रे टर्मिनस स्थानकावर एका महिलेवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी याप्रकरणी एरा कुलीला अटक केली. आरोपी महिलेला रिकाम्या ट्रेनमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिला तिच्या सुनेसोबत मुंबईला फिरायला आली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List