पुण्यात गुन्हेगारांची दादागिरी सुरूच, भररस्त्यात तरुणाचे अश्लील चाळे, विजय वडेट्टीवार संतापले
पुण्यात शनिवारी सकाळी अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. बीएमडब्लू कारमधून आलेल्या मद्यधुंद गौरव आहुजाने भररस्त्यात अश्लील चाळे करत सिग्नलवरच लघुशंका केल्याची घटना येरवडा परिसरात घडली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरावून संताप व्यक्त केला जात आहे. याच प्रकारावर आता काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनीही संताप व्यक्त केला आहे. पुण्यात गुन्हेगारांची दादागिरी सुरूच, असल्याचं ते X वर एक पोस्ट करत म्हणाले आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, ”पुण्यातील शास्त्रीनगर भर चौकात एका मद्यधुंद तरुणाने अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जागतिक महिला दिनाच्या सकाळीच घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एकदा शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. दारूच्या नशेत वेगाने गाडी चालवणं, रस्त्यावर अशोभनीय कृत्य करणं, त्यानंतर विरोध करणाऱ्या व्यक्तीला अश्लील हावभाव करणं हा गुन्हा फक्त निबंध लिहून घेऊन पुन्हा पोलिसांनी माफ करू नये.”
ते पुढे म्हणाले, ”या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. महिलांच्या सुरक्षेबाबत गाजावाजा करणाऱ्या सरकारने यावर तत्काळ पाऊल उचललं पाहिजे. दिवसेंदिवस पुण्यासारख्या शहरात महिलांची सुरक्षितता धोक्यात येत आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List