कायदा-सुव्यवस्था ढासळली नाही तर रसातळाला गेलीय, कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदारावर माफियांचा जीवघेणा हल्ला
जालना जिल्ह्यातील परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. यामुळे खळबळ उडालेली असून विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलीच नसून पार रसातळाला गेली असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून केला आहे.
‘कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदारावर जीवघेणा हल्ला करण्याची माफियांची हिंमत कुणामुळं होतेय आणि राज्यभरातील या माफियांच्या मुसक्या आवळण्यापासून सरकारला कोण रोखतंय? हे फक्त ढासळलेल्या नाही तर रसातळाला गेलेल्या कायदा व सुव्यवस्थेचं लक्षण आहे. सामान्य माणसांसोबचत अधिकाऱ्यांचाही जीव धोक्यात घालणारी माफियांची ही मुजोरी सरकार ठेचून का काढत नाही?’, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
परतूरच्या तहसीलदारांसोबत काय घडलं?
7 मार्च रोजी परतूरच्या तहसीलदार प्रतिभा मोरे या खासगी वाहनाने अवैध गौनखणीज उत्खनन प्रतिबंधामक कार्यवाही करण्यासाठी गेल्या होत्या. याच दरम्यान रात्री 1 च्या सुमारास परतूरमधील इंदिरानगरच्या पुढे आबा रोडच्या डाव्या बाजुला एका जेसीबी अवैध उत्खनन करून मुरूम एका हायवात भरताना दिसून आली. त्यामुळे त्या ठिकाणी तहसीलदार गेल्या असत्या हायवा व जेसीबी चालकाने जेसीबी घेऊन पळ काढला. त्यानंतर पथकातील व्यंकट दडंवाडसह महसूल अधिकारी गणेश काळे महसूल सेवकाच्या मोबाईलवर फोन करुन बोलवले तेव्हा पाठलाग सुरू केला असता पारडगाव रोडला जेसीबीचे टायर खराब झाल्याने जेसीबी थांबला. तेव्हा जेसीबी ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर परतूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना संपर्क साधून पोलीस पथक पाठवण्यास सांगितले. जेसीबीचे फोटो काढत असताना तेथे 6 ते 7 आरोपींनी तहसीलदारांच्या हातातील मोबाईल हिसकावला, शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि जेसीबी पळवून नेला. तसेच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून तहसलीदार प्रतिभा मोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List