रेल्वेचा कर्मचारीच फेकतोय कचरा, ‘स्वच्छता ही सेवा है…’ची ऐशी की तैशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात ‘स्वच्छता ही सेवा है’ अशी जाहिरात स्वच्छतेसाठी करण्यात येत आहे. रेल्वे आणि लोकलमधील या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, परंतु मोदींनी केलेल्या जाहिरातीकडे आणि स्वच्छतेकडे रेल्वेच्या एका कर्मचाऱ्यानेच दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे. एक रेल्वे कर्मचारी धावत्या ट्रेनमधून कचराकुंडीतील कचरा उचलून थेट रूळावर फेकत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने याची गंभीर दखल घेत त्या रेल्वे कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले आहे. रेल्वेतील कचरा विल्हेवाटीसाठी एक व्यवस्थित यंत्रणा आहे. त्यामुळे धावत्या ट्रेनमधून कचरा फेकणे हे उल्लंघन असल्याने कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List