छावा चित्रपटाचे हृदयाला भिडणारे डायलॉग लिहिणारा मुस्लिम लेखक कोण? घेतलं नाही एकही रुपयाचं मानधन
सध्या सर्वत्र ‘छावा’ चित्रपटाचं क्रेझ आहे. एकदा पाहिलेला ‘छावा’ची कथा प्रेक्षकांच्या मनावर कायमची कोरली जातेय. चित्रपटाचा प्रत्येकाच्याच मनावर खोलवर परिणाम होताना दिसतो. या चित्रपटात दाखवण्यात आलेली भव्यता ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
लोकांचा मिळणारा प्रतिसाद
सोबतच चित्रपटातील कलाकारांचेही तेवढेच कौतुक होत आहे. छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या विकी कौशलला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. त्याने अगदी जीव ओतून महाराजांची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे . आणि लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहाता नक्कीच त्याने योग्यरित्या भूमिकेला न्याय दिला असं म्हणायला हरकत नाही.
चित्रपटातील डॉयलॉग म्हणजे जमेची बाजू
तर रश्मिका महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. या चित्रपटातील सगळेच कलाकार चर्चेचा विषय ठरत आहेत. पण या चित्रपटाची अजून एक गोष्ट आहे जी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडते. ते म्हणजे चित्रपटातील डायलॉग. चित्रपटातील डॉयलॉग म्हणजे चित्रपटाची जमेची बाजू आहे.
चित्रपटाचे डायलॉग हे एका मुस्लिम लेखकानं लिहिले
पण तुम्हाला माहितीये का की ‘छावा’ सिनेमातील काव्यात्मक डॉयलॉग कोणी लिहिले आहेत ते? हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण चित्रपटाचे डायलॉग हे एका मुस्लिम लेखकानं लिहले आहेत. इरशाद कामिल असं या लेखकाचे नाव आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत गीतकार इरशाद कामिल यांनी याबद्दल सांगितलं. तसेच ‘छावा’ चित्रपटातील काव्यात्मक संवाद लिहिण्यासाठी त्यांनी कोणतेही शुल्क आकारले नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
लेखकाने घेतलं नाही एक रुपयाचं मानधन
ते म्हणाले, “गाण्यांव्यतिरिक्त, मी चित्रपटाचे काव्यात्मक संवाद लिहिण्यातही सहभागी झालो आहे. संभाजी महाराजांबद्दल असलेल्या आदरामुळे, मी त्यांच्याबद्दल लिहिण्यासाठी एक पैसाही घेतला नाही. आपण निदान एवढे तरी करूच शकतो”. पुढे ते म्हणाले, “संभाजी महाराज माझ्यासाठी केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाहीत, तर ते प्रेरणादायी आहेत. त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करत संवाद लिहिणे हा माझ्यासाठी एक अभिमानास्पद अनुभव होता. छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी यासाठी कोणतेही मानधन स्वीकारलं नाही,” असे इरशाद कामिल यांनी सांगितले.
दरम्यान इरशाद कामिल यांच्यासोबतच सिनेमातील काही डॉयलॉग ऋषि वीरवानी यांनीही लिहलेले आहेत. सिनेमातील जबरदस्त डॉयलॉग ऐकताना अंगावर शहारे येतात एवढं नक्की. आणि चित्रपटातील सीन्स हे खऱ्या अर्थाने जीवंत होतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List