14 वर्षाच्या मुलीचा आईच्या वयाच्या पुरुषासोबत विवाह, नांदण्यास नकार दिल्यानंतर नवऱ्याने केले धक्कादायक कृत्य
कर्नाटकमधील एका ढेंकणीकोट गावात एका 14 वर्षीय मुलीचा तिच्या आईने 29 वर्षाच्या पुरुषासोबत जबरदस्तीने बालविवाह लावून दिला. 3 मार्च रोजी हा विवाह पार पडला. त्यानंतर माहेरी आलेल्या पीडितीने माघारी जाण्यास नकार दिल्यानंतर तिचा पती व त्याचा भाऊ तिथे आला व तिला खेचत घराबाहेर काढून जबरदस्ती स्वत:सोबत घेऊन गेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या मुलीच्या आईला, नवऱ्याला व त्याच्या भावाला अटक केली आहे.
सदर मुलीचे कालिकुट्टई येथील 29 वर्षीय मधेशशी झालं होतं. पण मुलीचा लग्नाला विरोध होता. मात्र तरिही तिच्या आई वडिलांनी तिचे जबरदस्ती लग्न लावून दिले. त्यानंतर ती नवऱ्यासोबत सासरी गेली., मात्र दोन दिवसांनी ती माहेरी परतली व सासरी जाण्यास तिने नकार दिला. तिच्या आई वडिलांनी तिला समजावले व मात्र ती परत जाण्यास तयार नव्हती.
पत्नी परत येत नसल्याने स्वत: मधेश त्याच्या भावासोबत तिला घ्यायला आला. मात्र ती त्याच्या नातेवाईकाच्या घरी लपलेली होती. तिथे जाऊन मधेशने तिला घरातून खेचत बाहेर काढले व उचलून तिला घेऊन जाऊ लागला. ती मुलगी परत न जाण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडत होती. मात्र ना तिच्या आई वडिलांनी तिची दया आली ना तिच्या नवऱ्याला. मात्र तिच्या आजीने या जबरदस्तीविरोधात आवाज उठवत पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच या घटनचा व्हायरल व्हिडीओही पोलिसांना मिळाला. त्यानंतर पोलिसांनी मधेश, मल्लेश आणि मुलीची आई नागम्मा यांना अटक केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List