निम्मे नेते भाजपला मिळालेले आहेत; गुजरात काँग्रेसमधील गद्दारांची राहुल गांधींकडून पोलखोल
लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी गुजरातच्या अहमदाबादमध्ये पक्षातील गद्दारांची पोलखोल केली. काँग्रेसमध्ये नेत्यांची कमतरता नाही. काँग्रेसमध्ये बब्बर शेर आहेत. पण त्यांचे हात बांधलेले आहेत. तर निम्मे नेते भाजपसाठी काम करताहेत, असे म्हणत राहुल गांधी यांनी गुजरातमधील पक्षातील गद्दारांवर निशाणा साधला.
अहमदाबादमध्ये राहुल गांधी यांनी पक्षविरोधी काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना फैलावर घेतले. काँग्रेसमध्ये नेत्यांची कमी नाही. काँग्रेसमध्ये बब्बर शेर आहेत, पण त्यांचे हात बांधलेले आहेत. निम्मे भाजपसाठी काम करताहेत. आणि दुसरीकडे रेसच्या घोड्यांना काँग्रेस लग्नाच्या वरातीत पाठवते. काही लोकांची पक्षातून हकालपट्टी करायची असेल तर करा, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट जनतेशी नाळ जोडली पाहिजे. तेव्हा जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल, अशी कानउघाडणीही राहुल गांधी यांनी केली.
हृदयात काँग्रेस पाहिजे. हात कापला तर काँग्रेसचं रक्त यायला पाहिजे. गुजरात निवडणुकीवर बोलणार नाही. काँग्रेस पक्षाची विचारधारा ही गुजरातची विचारधारा आहे. जी गांधीजी आणि सरदार पटेल यांनी शिकवली आहे. नेत्यांनी जनतेशी जुळले पाहिजे. आपण भारत जोडो यात्रे हे करून दाखवले आहे. नेत्यांनी जनतेत जाण्याची गरज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
निम्मे नेते भाजपला मिळालेले आहेत; काँग्रेसमधील गद्दारांची राहुल गांधींकडून पोलखोल pic.twitter.com/j4VpKjDS49
— Saamana Online (@SaamanaOnline) March 8, 2025
गुजरातची जनता, व्यापारी, शेतकरी, मजूर, विद्यार्थ्यांना राज्यात विरोधी पक्ष हवा आहे. जनतेला गुजरातमध्ये B-टीम नकोय. हे दोन गट वेगळे करण्याची माझी जबाबदारी आहे. आपल्याला कठोर कारवाई करावी लागली तरी चालेल. 30-40 जणांना काढायचं असेल तर काढून टाकलं पाहिजे. भाजपचे लोक पक्षात राहून काम करत आहेत. त्यांची हकालपट्टी करा आणि बाहेर जाऊन त्यांना भाजपसाठी काम करू द्या. बघूया त्यांची जागा काय आहे. कारण भाजप त्यांना उचलून बाहेर फेकून देईल, असा टोला राहुल गांधी यांनी गद्दारांना लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List