‘मी इतका मुर्ख आहे की…’, KISS Controversy वर पहिल्यांदा स्पष्ट बोलले उदित नारायण

‘मी इतका मुर्ख आहे की…’,  KISS Controversy वर पहिल्यांदा स्पष्ट बोलले उदित नारायण

Udit Narayan KISS Controversy: प्रसिद्ध गायक उदित नारायण गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. कार्यक्रमात एका महिलेला किस करताना गायकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर अनेकांनी उदित नारायण यांना ट्रोल केलं. यावर उदित नारायण यांनी कधीच स्पष्टीकरण दिलं नाही. पण आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत किस प्रकरणावर उदित नारायण यांनी मौन सोडलं आहे.

उदित नारायण यांचं किस प्रकरण कदाचित शमलं असेल, पण आता त्यांनी या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करत संपूर्ण प्रकरणावर उघडपणे चर्चा केली आहे. जेव्हा गायकाला विचारण्यात आले की, तुमचा किसिंगचा वाद मिटला असला तरी आता तुम्हाला त्याबद्दल काय वाटते, उदित नारायणने धीटपणे उत्तर दिले.

उदित नारायण म्हणाले, ‘ज्या प्रकारे माझ्या जुन्या परदेशी म्यूझीक कार्यक्रमांचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहे, त्यावरुन कळतं की, जगात काही लोकांकडे बराच वेळ आहे दुसऱ्याची प्रतिमा कलंकित करण्यासाठी, जे अधिक यशस्वी आहे. दुसऱ्याती प्रतिमा कलंकित करण्यासाठी वेळ वाया घालवण्यापेक्षा मला असं वाटतं की, स्वतःच्या आयुष्याकडे एकदा बघावं… ‘

‘सेलिब्रिटींवर टीका करणे काही लोकांसाठी मजेदार असू शकतं, परंतु तुम्हाला त्यातून काहीही मिळणार नाही. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, काही सह-गायिकांनी सार्वजनिक आचरणाकडे लक्ष द्यावं असं म्हटलं होतं? यावर देखील उदित नारायण यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

उदित नारायण म्हणाले, ‘मी सर्वांच्या विचारांचा सन्मान करतो… संयम आणि प्रतिष्ठेबद्दल प्रत्येकाची स्वतःची विचारसरणी असते. स्टेजवर माझ्या चाहत्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देण्यात मला सन्मानाची कमतरता दिसली नाही. मी एवढा मूर्ख आहे का की मी स्टेजवर काही चुकीचे करेन?’ मी गेल्या 50 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे.

‘मी आजपर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्यांसाठी गाणं गायलं आहे. ते माझ्या आवाजावर प्रेम करतात. भारताच्या महान गायिका, आदरणीय आणि आदरणीय भारतरत्न लताजी यांनी सांगितलं होतं की, माझ्यासोबत असलेल्या सर्व गायकांमध्ये त्यांना माझा आवाज सर्वात जास्त आवडला. माझ्याविरुद्ध अशा गोष्टी बोलल्या गेल्यास मी घाबरून जाईन असं तुला वाटतं का?” असं देखील उदित नारायण म्हणाले.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या बसवर हल्ला, काळं फासलं; परिवहन मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर, कर्नाटक सरकारला कडक इशारा महाराष्ट्राच्या बसवर हल्ला, काळं फासलं; परिवहन मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर, कर्नाटक सरकारला कडक इशारा
कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. बसला काळं...
‘छावा’ मधील ‘येसूबाईं’च्या लूकसाठी खूप मेहनत; रश्मिकाच्या अंगावरील ही साडी तब्बल 500 वर्ष जुनी
Mahakumbh 2025 – प्रयागराजच्या महाकुंभमध्ये उघड्यावर शौच, राष्ट्रीय हरित लवादाचा योगी सरकारला दणका
चिखलीकर-चव्हाण यांच्यातील बेबनाव पुन्हा चर्चेत; चव्हाणांच्या भोकर या बालेकिल्ल्यात चिखलीकरांची टीका
Video – केदारकंठा सर करत शिवरायांना मुजरा! कोल्हापूरच्या 5 वर्षीय अन्वीचा जागतिक विक्रम
वाल्मीक कराडला जेलमध्ये मटण, व्हीआयपी ट्रिटमेंट; सुरेश धस यांचा मोठा दावा
जामिनावर सुटलेल्या आसाराम बापूचे आश्रमात प्रवचन; न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघनाची चर्चा